पाकिस्तानमध्ये होतोय हिंदूंचा छळ ; पाकनेही केले मान्य...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-May-2020
Total Views |

imran khan_1  H
 
नवी दिल्ली : पाकिस्तान या देशाने आंतरराष्ट्रीय पातळीवर तेथील अल्पसंख्यांकांवर होणाऱ्या हल्ल्यांबाबत नेहमी पडदा टाकला. मात्र, आता मानवाधिकार आयोगाने त्यांचा हा पडदा फाडला असून हिंदू समाजावर पाकिस्तानमध्ये हल्ले होत असल्याची बाब समोर आणली आहे. विशेष म्हणजे पाकिस्तान मानवाधिकार आयोगाने हा पडदा उठवला असून पाकमध्ये हिंदी आणि इसाईमुलींचे घरातून अपहरण केले जाते असे मान्य केले आहे. त्यामुळे पाकिस्तानमध्ये अल्पसंख्यांकांची सुरक्षा हा चिंतेचा विषय आहे.
 
पाकिस्तानच्या मानवाधिकार आयोगाने आपल्या वार्षिक अहवालामध्ये सांगितले आहे की कोरोना विषाणूच्या साथीमुळे २०१९मध्ये असुरक्षित आणि विशेषत: धार्मिक अल्पसंख्यांकांची प्रकृती आणखी बिकट होनर आहे. या अहवालात असेही म्हंटले आहे की धार्मिक अल्पसंख्याक, विशेषत: हिंदू आणि ख्रिश्चन लोक त्यांच्या धार्मिक स्वातंत्र्य किंवा मान्यतेचा पुरेपूर फायदा घेऊ शकत नाहीत, जे त्यांना घटनेनुसार हमी देण्यात आली होती. २०१९ मध्ये 'मानवाधिकार परिस्थिती' नावाच्या अहवालामध्ये नमूद केले आहे की, "बर्या्च समुदायांमध्ये, त्यांच्या धर्मस्थळांमध्ये भेदभाव केला जातो. तरुणींचे बळजबरीने धर्मांतर केले जाते आणि युवकांना नोकरी प्रवेशामध्ये भेदभाव केला जातो."
 
 
‘एचआरसीपी’चे प्रवक्ते रेहमान यांनी हा अहवाल जाहीर केल्यानंतर २०१९मध्ये पाकिस्तानच्या मानवाधिकारांच्या नोंदी 'अत्यंत चिंताजनक' म्हणून वर्णन केल्या आणि सध्या चालू असलेल्या जागतिक महामारीने मानवाधिकारांवर दीर्घकाळ पडसाद उमटण्याची शक्यता व्यक्त केली आहे. मानवी हक्कांच्या अपयशाला अधोरेखित करीत अहवालात स्वार्थासाठी खून करणे, अल्पसंख्याक समाजातील अल्पवयीन मुलींचे जबरदस्ती धर्मांतर करणे आणि लोकांना घाबरवण्यासाठी कायद्याचा वापर करणे अशा गंभीर बाबी या अहवालात नमूद केल्या आहेत.
 
 
@@AUTHORINFO_V1@@