‘पंतप्रधानांनीच पुढाकार घ्यायला हवा..’ लॉकडाऊनवर अनुराग कश्यप पुन्हा बरळला!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-May-2020
Total Views |

Anurag Kashyap_1 &nb



लॉकडाऊन कालावधी वाढवल्याने अनुरागची सरकारवर टीका


मुंबई : देशभरातील कोरोना बाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे सरकारने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुन्हा लॉकडाउनचा कालावधी दोन आठवड्यांनी वाढवण्याची घोषणा केली आहे. ३ मे रोजी लॉकडाउनचा दुसरा टप्पा पूर्ण होणार होता. मात्र हा टप्पा पूर्ण होताच ४ मे पासून तात्काळ स्वरुपात दोन आठवड्यांसाठी लॉकडाऊन सुरु राहणार असल्याची नवीन घोषणा केली. या निर्णयानंतर बॉलिवूड दिग्दर्शक अनुराग कश्यपने केंद्र सरकारवर टीका केली आहे.


‘लॉकडाउन असाच सुरु राहणार आहे, हे थांबणार नाहीयेत. सरकारकडे कोणतीही योजना नाही, कोणताही आराखडा नाही, आणि तितकी आर्थिक क्षमताही नाही. या परिस्थितीमध्ये सगळे राजकीय पक्ष,अर्थतज्ज्ञ, वैज्ञानिक, कॉर्पोरेटर्स या सगळ्यांनी एकत्र येऊन या समस्येवर मार्ग काढला पाहिजे आणि या सगळ्यावर पंतप्रधानांनी मार्ग काढला पाहिजे’, असे ट्विट अनुराग कश्यपने केले आहे. त्याच्या या ट्विटनंतर अनेकांनी त्याला ट्रोल केले आहे.





दरम्यान, अनुराग कश्यप सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात.देशभरात सध्या कोरोना विषाणूने आपली दहशत पसरवली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा लॉकडाउनचा कालावधी वाढविला आहे.या पार्श्वभूमीवर अनुरागने केलेले हे ट्विट सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. मात्र सध्या घडलेल्या इतक्या गोष्टींवर अनुरागने मौन बाळगले होते. लॉकडाऊन हा देशहितासाठी असल्याचे सांगत नेटकऱ्यांनी त्याला चांगलेच ट्रोल केले आहे.
@@AUTHORINFO_V1@@