राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या हस्ते भारतीय चिमुरडीचा गौरव

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-May-2020
Total Views |

donald trump_1  



अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या हस्ते या चिमुरडीचा गौरव करण्यात आला. ही चिमुरडी कोरोना योद्ध्यांचे मनोबल वाढविण्यासाठी त्यांना कुकीज आणि ग्रीटिंग बनवून देत होती भेट



वॉशिंग्टन
: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी १० वर्षीय भारतीय वंशाच्या श्राव्या अन्नापारेड्डी हिचा कोरोना लढ्यात दिलेल्या महत्वपूर्ण योगदानाबद्दल गौरव केला आहे. श्राव्या या लढ्यात उतरलेल्या कोरोना योद्धांना मदत करत आहे. ती नर्स, वैद्यकीय कर्मचारी आणि अग्निशमन दलातील कर्मचाऱ्यांचे मनोबल व धैर्य वाढावे व त्यांना योग्य सन्मान मिळावा या हेतूने रोज स्वतः बनवलेले कुकीज आणि ग्रीटिंग्ज कार्ड पाठवते आहे.


अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि फर्स्ट लेडी मेलानिया ट्रम्प यांनी शुक्रवारी कोरोनाशी झुंज देणाऱ्या अमेरिकन हिरोंचा सन्मान केला. यादरम्यान त्यांनी कोरोनाच्या संकटसमयी वैद्यकीय कर्मचार्‍यांचे धैर्य वाढविण्यात हातभार लावणाऱ्या श्राव्याचा गौरव केला. वॉशिंग्टन पोस्टच्या म्हणण्यानुसार, यावेळी ट्रम्प म्हणाले, "आज आपण अशा लोकांचा सन्मान करीत आहोत ज्यांनी या कठीण काळात समाजाप्रती असणारे नातेसंबंध अधिक दृढ केले. यासह, जेव्हा आपण एक नवी सुरुवात करू, तेव्हा हे ऐक्य आपल्याला पुन्हा नवी उंची गाठण्यासाठी सामर्थ्य देईल."


श्राव्या मूळची आंध्र प्रदेशातील


श्राव्या सध्यस्थितीत मेरीलँडमधील हिल्स एलिमेंटरी स्कूलमध्ये चौथीत शिकणारी विद्यार्थिनी आहे आणि स्काऊट ट्रूपची सदस्य आहे. ती मूळची भारतीय वंशाची असून आंध्र प्रदेशची आहे. श्राव्यासह तिच्या स्काऊटच्या आणखी दोन मुली लैला खान आणि लॉरेन मॅटिनी यांचा देखील गौरव करण्यात आला. या सर्वजणी १० वर्षांच्या आहे. त्यांनी आतापर्यंत स्थानिक डॉक्टर, परिचारिका व अग्निशमन दलाला १००डब्बे कुकीज भेट दिल्या आहेत. यासह त्यांनी २००ग्रीटिंग्ज कार्ड्स बनवून भेट दिले.
@@AUTHORINFO_V1@@