हिजबुलच्या कमांडरसह २ दहशतवाद्यांचा खात्मा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-May-2020
Total Views |

jammu kashmir_1 &nbs




श्रीनगर
: नवाकदल येथे दहशतवादी आणि सुरक्षादलात झालेल्या चकमकीत तहरीक-ए-हुर्रियतचे चेयरमैन मोहम्मद अशरफ खान यांचा मुलगा हिजबुल मुजाहिदीनचा दहशतवादी जुनैद अशरफ खान याचा मृत्यू झाला आहे. मंगळवारी श्रीनगरमध्ये मारल्या गेलेल्या अन्य दहशतवाद्यांमध्ये पुलवामा येथील तारिक अहमद शेख या दहशतवाद्याचा देखील समावेश आहे. सोमवारी रात्री झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी मारले गेले असल्याची माहिती सुरक्षा दलांनी दिली.


जम्मू काश्मीरचे डीजीपी दिलबाग सिंह यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, " जुनैद अशरफ खान हा हिजबुल मुजाहिदीन का डिवीजनल कमांडर होता त्याचबरोबर और केंद्रीय कश्मीर क्षेत्रावर देखरेख करण्याचे काम तो करत. अनेक गुन्ह्यांमध्ये त्याला दोषी ठरविण्यात आले आहे. तर तारिक अहमद शेख ने याचवर्षी मार्चमध्ये हिजबुल मुजाहिदीनशी जोडला गेला होता.



पोलिसांनी पुढे सांगितले की, त्यांच्या ताब्यातून पोलिसांनी काही हत्यारे जप्त केली आहे. तसेच गोळाबारूद देखील जप्त केले. या चकमकीच्या एक दिवस आधीच पोलिसांच्या चकमकीत याच टोळीतील एक दहशतवादी जखमी झाला होता. जम्मू काश्मीर पोलिसांनी सांगितले की, रविवारी रात्रीच हिजबुलचा मोठा दहशतवादी श्रीनगरमध्ये लपून बसल्याची माहिती पोलिसांच्या विशेष तपासणी पथकाला समजल्यानंतर पोलीस आणि जवानांनी सर्च ऑपरेशन सुरू केले. यावेळी घरात लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी गोळीबार केला. याआधी रविवारी झालेल्या चकमकीत हिजबुल मुजाहिद्दीनचा दहशतवादी ताहिर अहमद भटला ठार करण्यात आलं होतं. 11 दिवसांपूर्वी मृत्यू झालेल्या रियाज नायकू नंतरची ही दुसरी मोठी चकमकी होती.
@@AUTHORINFO_V1@@