लॉकडाऊन इफेक्ट ! उबर देणार ३ हजार कर्मचाऱ्यांना 'नारळ'

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-May-2020
Total Views |
uber _1  H x W:




नवी दिल्ली : अॅप आधारित कॅब सेवा देणाऱ्या उबरने कोरोना संकटातून सावरण्यासाठी तीन हजार कर्मचाऱ्यांना नोकरीतून काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवारी याबद्दल अधिकृत घोषणा करण्यात आली. उबरचे सीईओ दारा खोसरोशाही म्हणाले, "हा निर्णय आमच्यासाठी कठीण असला तरीही कंपनी आपल्या काही प्रकल्पांतील गुंतवणूक कमी करणार आहे."
 
 
 
यापूर्वी एकूण ३७०० कर्मचाऱ्यांना घरी पाठवण्यात आले आहे. या निर्णयामुळे उबरची एकूण कर्मचारी कपात २५ टक्के झाली आहे. याशिवाय जागतिक पातळीवर ४५ कार्यालये बंद करण्यात आली आहेत. या ठिकाणी सेल्फ ड्रायव्हींग कारसह अन्य प्रकारच्या प्रकल्पांवर काम सुरू होते. पुढील १२ महिन्यांत कंपनी आशिया पॅसिपिक येथील मुख्यालय हलवण्याचा विचारही सुरू आहे. दरम्यान, कंपनीने खर्चात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.
 
 
 
१ अब्ज डॉलर इतकी बचत या मार्फत केली जाणार आहे. २०२० वर्षात उबरने नफा कमावण्याच्या उद्देशाने अनेक योजना आखल्या होत्या. कोरोना विषाणूमुळे जगभरात ओढावलेल्या संकटाचा फटका या कंपनीलाही बसला. जेव्हा कधी हे संकट दूर होईल, त्यावेळी उबर ईस्ट ही सेवा ग्राहकांसाठी नव्या दमाने सुरू करण्यात येईल.
 
 
 
वी-वर्क इंडियातर्फे एकूण शंभर कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. कोरोना आणि लॉकडाऊनमुळे उद्भवलेल्या संकटाचा सामना करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. भारतात एकूण पाचशे कर्मचारी या कंपनीत रुजू आहेत. कर्मचारी कपातीना निर्णय जूनपासून लागू केला जाणार आहे.
@@AUTHORINFO_V1@@