३० दिवसांत ठोस पावले उचला नाहीतर...; डोनाल्ड ट्रम्प यांचे जागतिक आरोग्य संघटनेला पत्र!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-May-2020
Total Views |

Donald trump_1  


कायमस्वरूपी निधी बंद करण्याची दिली तंबी!

वॉशिंग्टन : गेल्या अनेक दिवसांपासून चीनमधून पसरलेल्या कोरोना विषाणूबद्दल जागतिक आरोग्य संघटनेवर संतापलेले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी डब्ल्यूएचओचे संचालक डॉ. टेड्रॉस अ‍ॅडॅनॉम गॅब्रेसेस यांना पुढील ३० दिवसांत ठोस पावले उचलण्याचे पत्र लिहिले आहे.


डोनाल्ड ट्रम्प यांनी पत्रात लिहिले आहे की, ‘डब्ल्यूएचओने जर येत्या ३० दिवसांत कोणतेही ठोस बदल केले नाही तर, आम्ही हा निधी कायमस्वरुपी थांबवू. त्याचबरोबर आम्ही संस्थेतील आमच्या सदस्यावरही फेरविचार करू.’ जगभर पसरलेल्या कोरोना विषाणूशी संबंधित डब्ल्यूएचओच्या भूमिकेचा आढावा घेइपर्यंत ट्रम्प यांनी अमेरिकेकडून दिला जाणारा निधी तात्पुरत थांबवला आहे.





यापूर्वी डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते की, लवकरच ते डब्ल्यूएचओबद्दल भूमिका घेतील. ते म्हणाले होते की, 'मी येत्या काळात यावर निवेदन देईन. मी जागतिक आरोग्य संघटनेवर आनंदी नाही. वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनवरही पूर्णपणे आनंदी नाही.' ट्रम्प यांनी डब्ल्यूएचओला दिला जाणारा ४५० दशलक्ष अमेरिकन डॉलर्समधून ४० दशलक्ष डॉलर्स निधी यापूर्वी कमी केला होता.


कोरोना विषाणूमुळे अमेरिकेत सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. अमेरिकेत आतापर्यंत १५,३५,१३२ लोकांना कोरोनाची लागण झाली असून, ९१,३०६ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर ३,५१,३४३ लोक कोरोनामुक्त झाले आहेत.
@@AUTHORINFO_V1@@