राज्यात रमजानच्या पार्श्वभूमीवर सीएपीएफच्या नऊ कंपन्या, गृहमंत्रालयाचा आदेश

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-May-2020
Total Views |
Maharashtra capf _1 




नवी दिल्ली : महाराष्ट्रात कोरोनाचा वाढता प्रकोप पाहता गृहमंत्रालयाने शनिवार दि. १६ मे रोजी जम्मू काश्मीरहून सीएपीएफ (CAPF) च्या १० कंपन्या हटवून तशा नऊ कंपन्या महाराष्ट्रात पाठवण्याचे निर्देश दिले आहेत. रमजानच्या पार्श्वभूमीवर पोलीस व्यवस्थेवर ताण येऊ नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
 
 
 
महाराष्ट्रातील कोरोना संक्रमितांचा आकडा हा ३० हजारांवर पोहोचला आहे. हजारहून अधिक कोरोना रुग्णांनी आपला जीव गमावला आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्र शासित प्रदेश जम्मूतील हजारहून अधिक जवानांच्या १० तुकड्या हटवण्यात आल्या आहेत. मात्र, येथे तैनात असणारे अर्धसैनिक दल कायम तैनात राहणार आहेत.


 
 
गृहमंत्रालयाच्या आदेशानुसार, नऊ कंपन्या महाराष्ट्रात तैनात केल्या जाणाऱ आहेत. त्यात चार रॅपिड एक्शन फोर्स, दोन केंद्रीय राखीव पोलीस दल, तीन केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल सामाविष्ठ असणार आहेत. जम्मूतून चार कंपन्या महाराष्ट्रात बोलावण्यात येणार आहेत.उर्वरित चार कंपन्यांना मुंबईहून तैनात केल्या जाणार आहेत.राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाव विषाणूमुळे लॉकडाऊनच्या काळात पोलीसांवर ताण येत आहेत. मुंबईत सर्वाधिक पोलीस कर्मचारी कोरोना बाधित आहेत. पुणे, मालेगाव आणि अमरावतीत सीएपीएफ कंपन्या तैनात केल्या जाणार आहेत.





@@AUTHORINFO_V1@@