नुस्तं रस्त्यावर बसून मजूरांचे प्रश्न सुटणार नाहीत : निर्मला सितारामण

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-May-2020
Total Views |
Rahul Gandhi _1 &nbs
 

सोनियांना राजकारण न करण्याचे आवाहन

 
 
नवी दिल्ली : सरकारी मदतीच्या घोषणांचे राजकारण करू नका, हात जोडून विनंती आहे, असा टोला अर्थमंत्री निर्मला सितारामण यांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना लगावला आहे. केवळ रस्त्यावर मजूरांशेजारी बसून काही होत नाही, असे म्हणत त्यांनी खासदार राहुल गांधींवर टीकाही केली आहे. 


आर्थिक पॅकेजची माहिती देण्यासाठी पाचव्या आणि शेवटच्या पत्रकार परिषदेत पत्रकारांशी चर्चा करत असताना त्यांनी काँग्रेसशासित राज्यांमध्ये मजूरांच्या परतीच्या प्रवासासाठी जादा रेल्वे गाड्यांची मागणी का होत नाही, असाही सवाल त्यांनी विचारला. मजूरांशी रस्त्यावर बसून गप्पा मारण्यापेक्षा ते रेल्वेची मागणी करून घरी का पोहोचवत नाही, हा केवळ दिखावा नाही का ?. असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला. 


मजूरांचे सामान उचलून घ्यायवा हवे होते.


निर्मला सितारामण म्हणाल्या, "राहुल गांधी यांनी मजूरांशी गप्पा मारून फोटो काढण्यापेक्षा त्यांचे सामान उचलून काही अंतरावर त्यांना सोडले असते तर त्यांना मदत झाली असती. रस्त्याच्या कडेला बसून गप्पा मारून काहीही होत नाही, असा टोला त्यांनी राहुल गांधींना लगावला.


सोनिया गांधींना हात जोडून विनंती !


अर्थमंत्री निर्मला सितारामण यांनी सोनिया गांधींना हात जोडून विनंती केली की, कोरोना मदतीच्या घोषणांसंदर्भात राजकारण करू नये. ही वेळ राजकारण करण्याची नाही. एकत्र येऊन या महामारीविरोधात लढण्याची गरज आहे. सर्व राज्यांनी एकत्र येत काम करायला हवे, असेही त्या म्हणाल्या.
 



@@AUTHORINFO_V1@@