गेली ७० वर्ष पाक काश्मीरची भिक मागत आहेत ; गंभीरचा आफ्रिदीवर पलटवार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-May-2020
Total Views |

Gambhir Afridi_1 &nb
 
 
नवी दिल्ली : पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहीद आफ्रिदी अनेकवेळा भारताबद्दल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल काहीनाकाही बरळत असतो. काही दिवसांपूर्वी त्याने काश्मिरबद्दल काही वादग्रस्त वक्तव्य केले होते, यावर भाजप खासदार आणि माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर याने पुन्हा एकदा खडेबोल सुनावत त्याची शाळा घेतली आहे.
 
 
 
 
 
शाहीद आफ्रिदी म्हणाला होता की, “नरेंद्र मोदी हे भित्रे आहेत. कारण त्यांनी सात लाख सैन्य फक्त काश्मीरमध्येच ठेवले आहे. आमच्या देशाचा विचार केला तर पाकिस्तानात मिळून सात लाखांचे सैन्य आहे. त्यांच्या मागे आमचे २० कोटी लोकांचे सैन्यही आहेच.” यावर गंभीरने आफ्रिदीला चांगलेच उत्तर दिले आहे. त्याचा भारत आणि पंतप्रधान मोदींबद्दल अक्षेपार्ह्य वक्तव्य करतानाचा एक व्हिडियो चांगलाच वायरल झाला होता. यावरून भारतासह अनेक क्रिकेटप्रेमींनी त्याच्यावर टीका केली होती.
 
 
 
 
 
गौतम गंभीर आफ्रिदीला उद्देशून म्हणाला की, “पाकिस्तानची लोकसंख्या २० कोटी एवढी आहे, तर त्यांच्याकडे सात लाखांचे सैन्य आहे. तुम्ही गेल्या ७० वर्षांपासून काश्मीरची भीक मागत आहेत. भारत आणि पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका करणारे आफ्रिदी आणि इम्रान खान हे जोकर आहेत. कारण ते पाकिस्तानच्या लोकांची फसवणूक करत आहेत. त्याचबरोबर ते मोदी यांची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न करत आहेत. जेव्हा निर्णय येईल, तेव्हा तुम्हाला काश्मीर मिळणार नाही. तुम्हाला बांगलादेश लक्षात आहे ना?”
 
 
@@AUTHORINFO_V1@@