अमेरिकेकडून व्हेंटिलेटर मदतीच्या घोषणेवर पंतप्रधान मोदींची प्रतिक्रिया!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-May-2020
Total Views |

modi_1  H x W:


भारत-अमेरिका मैत्री अधिक दृढ होईल म्हणत मोदींनी मानले ट्रम्प यांचे आभार 


दिल्ली : कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या २०० व्हेंटिलेटर भारताला देण्याच्या घोषणेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रतिक्रिया दिली. कोरोना साथीच्या विरोधात एकत्रित लढा उभारला जातअसल्याचे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्रम्प यांचे आभार मानले. भारत आणि अमेरिका यांच्यातील मैत्री आणखी दृढ होईल असेही ते म्हणाले. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी ट्विट करत कोरोना विषाणूविरूद्ध लढ्यात अमेरिका भारत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी उभा असल्याचे म्हंटले. ट्रम्प यांनी आपल्या ट्विटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अतिशय चांगले मित्र म्हणून वर्णन केले.





यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत म्हंटले की, 'डोनाल्ड ट्रम्प यांचे आभार. या साथीचा सामना करण्यासाठी आपण सर्वांनी एकत्रितपणे लढा दिला आहे. अशा वेळी, सर्व राष्ट्रांनी एकत्रितपणे कार्य करणे आणि आपल्या जगास निरोगी बनवण्यासाठी आणि कोविड१९ पासून मुक्त करण्यासाठी शक्य तितके प्रयत्न करणे नेहमीच महत्वाचे ठरणार आहे. भारत-अमेरिका मैत्री अधिक दृढ होईल.’, असा विश्वासदेखील व्यक्त केला.



@@AUTHORINFO_V1@@