औरियामध्ये ट्रक अपघातात २४ मजुरांचा दुर्दैवी मृत्यू

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-May-2020
Total Views |

truck accident_1 &nb


सर्व स्थलांतरित मजूर राजस्थानमधून निघाले होते घरी


औरिया : उत्तर प्रदेशातील औरिया येथे शनिवारी पहाटे झालेल्या ट्रक अपघातामध्ये २४ मजुरांचा मृत्यू झाला आहे. हे सर्व मजूर राजस्थानवरून येत होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सर्व मजूर चुना भरलेल्या एका ट्रकमधून प्रवास करत होते. चिरुहली गावाजवळ उभ्या असलेल्या एका ट्रकला हा ट्रक जाऊन धडकला आणि त्यानंतर दोन्ही ट्रक खड्ड्यात उलटले.


औरियाचे डीएम अभिषेक सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात पहाटे ३:३० वाजता झाला. यामध्ये २४ लोकांचा मृत्यू झाला असून २० जण जखमी आहेत. बहुतांश लोक बिहार, झारखंड आणि पश्चिम बंगालमधील आहेत. अपघातातील एका जखमी मजुराने सांगितल्याप्रमाणे ट्रकमध्ये ४० मजूर होते. अपघातानंतर जखमींना त्वरित जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.


देशात लॉकडाऊन दिवसेंदिवस वाढत चालल्यामुळे परिस्थिती गंभीर बनत चालली आहे. यामुळे रोजंदारीवर पोटाची खळगी भरणाऱ्या स्थलांतरित मजूरांची घरचा रस्ता धरला आहे. अनेक मजूर पायी आपल्या घरच्या दिशेने निघाले आहेत तर काही रस्त्यात मिळेल त्या वाहनांमधून प्रवास सुरु केला आहे.
@@AUTHORINFO_V1@@