चीनला वठणीवर आणण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची नवी खेळी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-May-2020
Total Views |

America_1  H x



अमेरिका कोट्यवधी डॉलर्सचे पेन्शन फंड चीनकडून काढून घेणार


वॉशिंग्टन : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झाल्यानंतर अमेरिका-चीन संबंध दिवसेंदिवस बिघडत चालले आहेत. अमेरिकेने चीनला आर्थिक धक्के सुरवात केली आहे. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रशासनाला चीनमधून अमेरिकन पेन्शन फंडातील कोट्यवधी डॉलर्सची गुंतवणूक मागे घेण्याचे आदेश दिले आहेत. कोरोना विषाणूशी संबंधित चीनच्या भूमिकेबद्दल अमेरिकेने निराशा व्यक्त केली आहे. कोरोना विषाणूमुळे अमेरिकेत आतापर्यंत ८४०००हून अधिक लोकांचा बळी गेला आहे


फॉक्स बिझिनेस न्यूजवर जेव्हा डोनाल्ड ट्रम्प यांनी याबाबत माहिती दिली. याआधीही अमेरिकेने कोरोनासंदर्भात चीनवर अनेक आरोप लावले आहेत. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी चीनने दुर्लक्ष केल्याबद्दल चीनवर बंदी घालण्याच्या मागणीचा ठराव सिनेटमध्ये मांडलेल्या अमेरिकन खासदारांवर चीन कारवाई करण्याचा विचार करीत आहे. कोरोना विषाणूमुळे अमेरिका आणि चीनमध्ये शीतयुद्ध सुरू झाले आहे. अमेरिका कोरोना विषाणूसाठी चीनवर दोषारोप करीत आहे, तर चीन हे आरोप नाकारत आहे.
@@AUTHORINFO_V1@@