सिक्कीमच्या लुगनक भागात हिमस्खलन; लेफ्टनंट कर्नल आणि एक जवान शहीद

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-May-2020
Total Views |

uttarakhand_1  


गस्तीवर असणाऱ्या १६ जवानांना वाचवण्यात बचाव पथकाला यश


गंगटोक : सिक्कीमच्या उत्तर भागात गुरुवारी झालेल्या हिमस्खलनात कर्नल आणि एक जवान शहीद झाले आहेत. जवान गस्त घालत असताना ही घटना घडली. एकूण १८ जवान बर्फाखाली दबले होते. बचाव पथकाने १६ जणांना सुरक्षित बाहेर काढले. एसएस राव या जवानाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. लेफ्टनंट कर्नल रॉबर्ट टीए बर्फाखाली दबल्यामुळे सापडत नव्हते. नंतर बचाव पथकाला त्यांचा मृतदेह सापडला.


लष्कारातील सुत्रांनी सांगितले की, आमची टीम लुगनक भागात गस्त घालण्यासह बर्फ हटवण्याचे काम करत होती. त्यावेळी १६ हजार ७०० फूट उंचीवर हिमस्खलन झाले आणि सैनिक त्याखाली दबले. गेल्या एका आठवड्यात उत्तर सिक्कीममध्ये हिमस्खलनाची ही तिसरी घटना आहे.


यावर्षी जानेवारी जम्मू-काश्मिरच्या गांदेरबल भागात हिमस्खलन झाले होते. यामुळे यामुळे श्रीनगर-कारगिल रोडवरील गगनगीर परिसर बंद झाला होता. स्थानिक लोक आणि अधिकाऱ्यांनी शोध आणि बचाव मोहीम राबविली होती. यावेळी ४ नागरिकांना वाचवण्यात आले. काश्मीरमध्ये हिवाळ्यात काळात हिमस्खलन होत असतात.
@@AUTHORINFO_V1@@