आत्मनिर्भर गुजरात योजना : एक लाखांचे कर्ज मिळणार केवळ दोन टक्के व्याजावर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-May-2020
Total Views |
Vijay Rupani _1 &nbs





महाराष्ट्र सरकार काय करणार ?

अहमदाबाद : कोरोना महामारीच्या आर्थिक संकटातून सावरण्यासाठी गुजरात सरकारने महत्वकांशी निर्णय घेतला आहे. आत्मनिर्भर गुजरात सहाय्य योजने अंतर्गत अल्प उत्पन्न गटांसाठी विनातारण एक लाखांचे कर्ज केवळ दोन टक्के व्याजदराने उपलब्ध करून देण्यात येणार आहे. उर्वरित सहा टक्के व्याज गुजरात सरकार भरणार आहे. याचा फायदा किरकोळ व्यापारी आणि लघु उद्योजकांनाही होणार असून कोरोनामुळे रुतलेला आर्थिक गाडा सावरण्यासाठी मदत होईल, असा विश्वास गुजरात राज्य सरकारने व्यक्त केला आहे.

आत्मनिर्भर गुजरात सहाय्य योजने अंतर्गत सुरू करण्यात आलेल्या या कर्जवाटप योजनेची नियमावली गुरुवारी जाहीर करण्यात आली आहे. पुढील तीन वर्षांत या कर्जाची परतफेड लाभार्थी करणार आहेत. तसेच कर्जाचा पहिला हप्ता सहा महिन्यांनंतर सुरू होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहिर केलेल्या आत्मनिर्भर भारत या योजनेप्रमाणेच गुजरात सरकारने ही योजना लागू केली आहे.

मुख्यमंत्री विजय रुपाणी म्हणाले, "देशाला आत्मनिर्भर बनवण्यासाठी पुढाकार घेत गुजरात सरकारतर्फे अल्प उत्पन्न गट, किरकोळ व्यापारी, लघू उद्योजक, रिक्षाचालक, इलेक्ट्रीशन आदींसारख्या समाजातील घटकांसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. आत्मनिर्भर गुजरात योजने अंतर्गत पाच हजार कोटींचे कर्जवाटप करण्याचे लक्ष्य राज्य सरकारने ठरवले आहे."


राज्यातील दहा लाख जनतेला याचा फायदा होणार असून केवळ दोन टक्के व्याज त्यांना भरावे लागणार आहे. उर्वरित सहा टक्के व्याज सरकार भरणार आहे. राज्यातील २६० अर्बन को. ऑपरेटीव्ह बँकासह एकूण हजार शाखा, १८ जिल्हा सहकारी बँकांच्या १४०० शाखा तसेच क्रेडीट सोसायटींच्या मदतीने हा टप्पा गाठणार असल्याचा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला. 'सरकार शेड्युल बँका आणि वित्तीय संस्थांसह याबद्दल विस्तृत चर्चा करणार आहे. त्यानंतर लवकरच याबद्दल सविस्तर माहिती जनतेला दिली जाईल, असेही ते म्हणाले.



@@AUTHORINFO_V1@@