मातृशक्तीवर हल्ला...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-May-2020   
Total Views |

kabul terrorist attack_1&
इस्पितळामध्ये अंदाधुंद गोळीबार केला गेला. त्यात नुकत्याच बाळाला जन्म दिलेल्या माता मृत्युमुखी पडल्या. तेथील नवजात बालकं जन्मत:च दहशतवाद्याच्या क्रूर हल्ल्यात सापडली. त्यांच्या माता या हल्ल्यात मरण पावल्या.  रक्तामांसांचा खच, मरणआकांताने रडणार्‍या त्या माता, त्यांची नवजात बालकं, त्या गरोदर महिला सगळ्यांवर क्रूरपणे हल्ला केला गेला. या गदारोळात एका महिलेची प्रसुतीही झाली. एका कोपर्‍यात कुठेतरी कसे तरी तिने बाळाला जन्म दिला.

अफगाणिस्तानच्या पश्चिम काबूल भागात ‘दाश्त-ई-बारची’ या प्रसुती इस्पितळावर मंगळवार, दि.१३ मे रोजी दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला. गरोदर स्त्रिया, नुकतेच बाळाला जन्म देणार्‍या माता आणि नवजात बालके त्यावेळी इस्पितळात होती. या इस्पितळामध्ये अंदाधुंद गोळीबार केला गेला. त्यात नुकत्याच बाळाला जन्म दिलेल्या माता मृत्युमुखी पडल्या. तेथील नवजात बालकं जन्मत:च दहशतवाद्याच्या क्रूर हल्ल्यात सापडली. त्यांच्या माता या हल्ल्यात मरण पावल्या. रक्तामांसांचा खच, मरणआकांताने रडणार्‍या त्या माता, त्यांची नवजात बालकं, त्या गरोदर महिला सगळ्यांवर क्रूरपणे हल्ला केला गेला. या गदारोळात एका महिलेची प्रसुतीही झाली. एका कोपर्‍यात कुठेतरी कसे तरी तिने बाळाला जन्म दिला.
गरोदर महिला आणि नुकत्याच जन्मलेल्या बाळांवर, त्यांच्या मातांवर हा हल्ला कोण करू शकेल, याचा अंदाजही कुणी करू शकत नव्हते. जगाच्या इतिहासात क्रूर हल्ले झाले नाही, असे नाही. पण स्वत:च्याच देशात स्वत:च्याच धर्माच्या नागरिकांना तेही आयाबायांना असे वेचून मारणारे कोण होते? त्या नवजात बालकांची मारेकर्‍यांना जराही दया आली नाही? गरोदर महिलेला, नवजात अर्भकाला पाहिले की कितीही क्रूर व्यक्ती असू दे, तिच्या मनात थोडी तरी त्यांच्याबद्दल कणव दाटून येते. पण,त्या प्रसुती इस्पितळात हल्ला करणार्‍या या क्रूरकर्म्यांना काही काही वाटले नाही. क्रूरतेचा कळस गाठत त्यांनी हल्ला केला. त्यानंतर सुरक्षारक्षकांनी त्या क्रूर दहशतवाद्यांचा खात्मा केलाच म्हणा. पण, तोपर्यंत फार उशीर झाला होता.

कितीतरी माता आपल्या बाळांना अनाथ बनवत मृत्युमुखी पडल्या होत्या. नाही म्हणायला इस्पितळातले १८ नवजात अर्भक या हल्ल्यातून बचावले होते. तसेही त्यांना या जगात येऊन २४ तासही झाले नव्हते. दहशतवाद, हल्ला, मृत्यू, दु:ख, भय याबद्दल त्यांना जाणीव नसणारच. बिचारे जगात जन्म घेतला आणि त्यांना या दहशतवादी हल्ल्याचा सामना करावा लागला. इस्पितळामध्ये सुरक्षारक्षक आणि प्रशासनाने दहशतवाद्यांना घेरले. त्यावेळी बाहेर लोक जमा होऊ लागले होते. या इस्पितळात ज्यांच्या आयाबहिणी पत्नी होत्या तेच ते लोक होते. महिलांवर आणि त्यातही अशा अडचणीत असलेल्या महिलांवर हल्ला केला जाऊ शकतो, याबद्दल सगळ्यांना मनस्वी चीड संताप आला होता. तसेही दहशतवाद्यांनी आपली विकृत मनोवृत्ती पेशावर हल्ल्याच्या वेळीही दाखवली होतीच म्हणा. तरीदेखील कुठेतरी वाटत होते की, नाही महिलांवर आणि तेही गरोदर महिला आणि नुकत्याच बाळाला जन्म देणार्‍या आईवर कुणीही हल्ला करणार नाही.
पण, रमजान-रोजाच्या पवित्र काळात अफगाणिस्तानसारख्या इस्लामिक राष्ट्रात हे घडले. इस्लामचा खोटा हवाला देऊन इस्लामला बदनाम करून दहशतवादी राक्षसी कृत्ये करतात. त्याचा एक अत्यंत जीवघेणा नमुना म्हणजे या इस्पितळावरचा हल्ला होता. अफगाणिस्तान जनतेने या हल्ल्याची तीव्र निंदा केली. जनतेच्या प्रक्षोभाला घाबरून की काय, या हल्ल्याची जबाबदारी कुणीही घेतली नाही. मात्र, काही लोकांचे म्हणणे आहे की, हे कृत्य ‘इसिस’ने केले असावे. कारण, ‘द इंटरनॅशनल मेडिकल ह्युमॅनेटिरीअन ऑर्गनायझेशन डॉक्टर्स विदाऊट बॉर्डर्स/मेडिसीन सॅन फ्रन्टायर’ (एमएसएफ) या संस्थेने तसे पाहायला गेले तर १९८० पासून ‘एमएसएफ’ अफगाणिस्तामध्ये जीव धोक्यात घालून आरोग्यसेवा करीत आहे.



अनेक वेळा या संस्थेच्या डॉक्टर्स आणि इतर अधिकार्‍यांवर हल्लेही झाले आहेत. कित्येकांचे अपहरण करून त्यांना जीवे मारले आहे. ‘एमएसएफ’ या संघटनेनेच २०१४ साली हे ५५ बेडचे प्रसुती इस्पिताळ पश्चिम काबूलमध्ये सुरू केले. २०१४ सालापासून आजतागायत इथे ५४०१ बालकं जन्माला आली. या इस्पितळावर हल्ला करण्याचे कारण एकच की, अमेरिका आणि तालिबान्याची शांतीवार्ता. ‘आम्ही कोणत्याही अटीवर आमचा दहशतवाद सोडणार नाही, उलट आणखीन दहशत माजवू,’ हा संदेश या दहशतवाद्यांना जगाला द्यायचा आहे. पण, त्यांच्या या कृत्याने ते त्यांच्याच देशातल्या, त्यांच्याच धर्मातल्या लोकांच्याही नजरेतून उतरले आहेत. ‘७२ हूर’च्या शोधात या दहशतवाद्यांनी मातृशक्तीवर हल्ला केला आहे. त्यांचे इमान त्यांचे दीन आणि धर्म यावर काय सांगतो, याबद्दल हे दहशतवादी कधी तरी बोलतील का?
@@AUTHORINFO_V1@@