भारतीय पारंपारिक औषधीच कोरोनावर गुणकारक ठरेल : श्रीपाद नाईक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-May-2020
Total Views |
 
ayush_1  H x W:



नवी दिल्ली : आयुष मंत्रालय आणि वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन परिषद (सीएसआयआर) यांच्या एकत्रित आयुषच्या चार औषधांवर संशोधन करत आहेत, ज्याचा उपयोग कोरोना विषाणूच्या उपचारासाठी केला जाईल. गुरुवारी केंद्रीय आयुष राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) श्रीपाद नाईक यांनी ट्विटरवरुन याबाबत माहिती दिली. यात ते म्हणाले की, या सर्व औषधींच्या चाचण्या पुढील एका आठवड्यात सुरू होतील.



नाईक यांनी ट्वीट केले, "आयुष आणि सीएसआयआर मंत्रालय कोरोनाविरूद्ध आयुष फॉर्म्युलावर एकत्र काम करत आहेत आणि या औषधींच्या चाचण्या पुढील आठवड्यात सुरू घेण्यात येतील. याचा उपयोग कोविड१९ च्या रूग्णांसाठी 'एड ऑन थेरेपी अँड स्टैंडर्ड केयर' म्हणून केला जाईल. आम्हाला आशा आहे की आपली पारंपारिक औषधी प्रणालीच आपल्याला या साथीच्या रोगावर मात करण्यासाठी मार्ग दाखवेल.'





केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत ३७२२ नवीन रुग्ण आढळले आहेत आणि १३४ लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर, देशभरात एकूण कोरोना पॉझिटिव्हची संख्या ७८,००३ वर पोचली आहे, त्यापैकी ४९,२१९ कार्यरत आहेत. २६,२३५ लोक स्वस्थ आहेत किंवा त्यांना रुग्णालयातून सोडण्यात आले आहे आणि २५४९ जणांचा मृत्यू झाला आहे. संसर्ग झालेल्यांची संख्या ७८ हजारांच्यावर गेल्यानंतर ५० हजाराहून अधिक संक्रमित देशांच्या यादीत भारत १२व्या स्थानावर पोहोचला आहे. कोरोनामुळे महाराष्ट्र सर्वाधिक बाधित राज्य आहे. राज्याची अवस्था सातत्याने खालावत आहे. राज्यात २५,९२२लोकांना विषाणूची लागण झाली असून ९७५लोक मरण पावले आहेत. त्याच वेळी संसर्गातून ५,५४७ लोक बरे झाले आहेत.
@@AUTHORINFO_V1@@