कराचीच्या हिंदू मंदिरात शाहीद आफ्रिदीकडून धान्यवाटप

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-May-2020
Total Views |

shahid afridi_1 &nbs
नवी दिल्ली : जगभरामध्ये कोरोनाने थैमान घातले आहे. यामध्ये पाकिस्तानमध्ये कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत आहे. अशामध्ये इम्रान खानच्या सरकारकडून तेथील हिंदू अल्पसंख्यांक गरजू नागरिकांकडे दुर्लक्ष करत असल्याचे वारंवार समोर आले आहे. अशामध्ये पुन्हा एकदा पाकिस्तानचा वादग्रस्त माजी क्रिकेटपटू शाहीद आफ्रिदीने कराचीच्या प्रसिद्ध लक्ष्मीनारायण मंदिरात हिंदूंना धान्य वाटप केले आहे. शाहीद आफ्रिदी फौंडेशन मार्फत त्याने हे धान्यवाटप केले आहे. यावेळी पाकिस्तानचे स्क्वॅश खेळाडू जहांगिर खानही सोबत होते.
 
 
 
 
 
पाकिस्तानात ३५ हजारांपेक्षा जास्त जणांना कोरोनाची लागण झाली आहे. पाकिस्तान सरकारने केलेल्या लॉकडाऊनमुळे तिथल्या लोकांवर उपाशी राहण्याची वेळ आली आहे. यावेळी लक्ष्मी नारायण मंदिरात पोहोचल्यावर आफ्रिदीने मंदिरातल्या गरजू हिंदूंना रेशनचे वाटप केले. शाहिद आफ्रिदीने स्वत: ट्विटरवरून ही माहिती दिली. ‘या संकटात आम्ही एकत्र आहोत. एकता हीच आमची शक्ती आहे,’ असे आफ्रिदीने या ट्विटमध्ये म्हंटले आहे. यापूर्वीही त्याने सिंग येथील हिंदू नागरिकांना रेशन वाटप केले होते.
 
 
@@AUTHORINFO_V1@@