आमची घरे जाळली, मंदिर जाळले; पोलीसांनी आम्हालाच मारले !

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-May-2020
Total Views |
Telinipada areas _2 




 

प.बंगालमध्ये तेलिनीपाडा भागांत 'लॉकडाऊन'वरून हिंसाचार

 

कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये तेलिनीपाडा या हुगळी जिल्ह्यातील चंदन नगर भागात हिंसाचाराची घटना उघडकीस आली आहे. हिंदूंना या ठिकाणी शस्त्रांचा धाक दाखवत त्यांचा छळ करण्यात आल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. भाजपच्या नेत्यांनीही हाच आरोप लावला आहे. पश्चिम बंगालचे भाजप प्रभारी कैलाश विजयवर्गीय यांनी व्हीडिओ शेअर करत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना या प्रकाराचा जाब विचारला आहे.
 
 
 
स्थानिकांनी नाव ना प्रकाशित करण्याच्या अटीवर सांगितले कि, इथे सर्व धर्माचे लोक राहतात, विक्टोरिया जूट मिल येथील हा भाग आहे. इथल्या उर्दी बाजारात कोरोनाचा एक रुग्ण आढळला होता. त्यात पती पत्नीचा सामावेश होता. कोलकाता येथे त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांच्या संपर्कात आलेल्या एकूण २० लोकांना क्वारंटाईन करण्यात आले. यांच्या चाचणीत कोरोना पॉझिटीव्ह असा अहवाल आल्यानंतर या तेलिनीपाडा येथील टेस्टींग सुरू करण्यात आली.
 
 
 
 
एका मिठाई दुकानदाराला कोरोना झाल्यानंतर त्याला इलाजासाठी पाठवून देण्यात आले. पोलीसांनी हा विभाग कंटेन्मेंट झोन म्हमून घोषित केला होता. चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मात्र, स्थानिकांनी केलेल्या आरोपात काही विशिष्ट लोकांकडून याचे उल्लंघन केले जात होते. यापूर्वीही धार्मिक हिंसेमुळे हा विभाग चर्चेत आला होता. यापूर्वी इथे एक अवैध हत्यारांचा कारखाना धाड टाकून बंद करण्यात आला होता.




 
 
 
 
ज्यावेळी स्थानिकांनी या लॉकडाऊनचे उल्लंघन करणाऱ्यांना हटकले तेव्हा रमजानचे कारण देत आम्हाला बाहेर जावे लागेलच असे म्हटले. त्यांनी पोलीसांशीही हुज्जत घालण्यास सुरुवात केली होती. तीन दिवसांपूर्वी इथे पाऊस कोसळला होता. यावेळीच काही समाजकंटकांनी धारधार शस्त्रास्त्रे घेत लोकांच्या घरात घुसून आतंक माजवला होता. तोडफोड केली. अत्याचार झालेली लोकवस्ती बहुतांश हिंदूच होती. पोलीसांनीही त्यांचे म्हणणे ऐकले नाही. अनेकांची दुकाने लुटली गेली मात्र, त्यांना न्याय मिळाला नाही.
 
 
 
सुरज साव नामक एका व्यक्तीच्या दुकानाची लूट झाली होती. पोलीसांकडे तक्रार करत त्याने आपल्या दुकानातील सामान खाली करण्याची परवानगी मागितली होती. मात्र, पोलीसांनी त्याला परवानगी न देता वाऱ्यावर सोडून दिले. दंगेखोरांनी त्याच्या दुकानाला आग लावून खाक केले होते. या भागातच एका सोनाराचे दुकानही होते. त्याचीही लूट करण्यात आली.



 
 
 
 
भाजप खासदार लॉकेट चॅटर्जी यांना ही बाब समल्यावर त्यांनी घटनास्थळी जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलीसांकडून त्यांना रोखण्यात आले. त्यानंतर त्यांना या प्रकाराचे व्हीडिओ शेअर करत या प्रकरणी कोलकाता सरकारकडे दाद मागितली आहे. त्यानंतर काही पीडितांना रात्री पोलीसांनी उचलून नेत तुरुंगात डांबले आहे. अन्याय करणारे मोकाट आणि ज्यांच्यावर अत्याचार झाला त्यांना तुरुंगात हा कोणता न्याय, असा सवाल आता विचारला जात आहे.
 
 
 
 
हा प्रकार समजल्यानंतर स्थानिक भागात १७ मे पर्यंत इंटरनेट बंद करण्यात आले आहे. हिंदूंवर होणाऱ्या या अत्याचाराला वाचा फोडणाऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न ममता सरकार करत असल्याचा आरोप भाजपने केला आहे. इथल्या मंदिराचीही नासधूस करण्याचा प्रयत्न समाजकंटकांनी केला आहे. खासदार चॅटर्जी यांना पोलीसांनी घटनास्थळी जाण्यापासून रोखले आहे. पीडितांचा आवाजही प्रसार माध्यमांनी दाबून टाकल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. या हिंसाचार प्रकरणात आत्तापर्यंत ५६ लोकांना अटक करण्यात आली असून या भागात कलम १४४ लावण्यात आले आहे. अतिरिक्त पोलीसांची कुमकही बोलवण्यात आली आहे.



Telinipada areas _1 
 



@@AUTHORINFO_V1@@