भारतीय रेल्वेची ‘पॅसेंजर ट्रेन’ सेवा आजपासून सुरु!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-May-2020
Total Views |
aarogya setu_1  

ट्रेनमधून प्रवास करण्यासाठी ‘आरोग्य सेतु अ‍ॅप’ डाऊनलोड करणे बंधनकारक!



मुंबई : कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी देशात राबविण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे जवळपास ५० दिवसांपासून बंद असलेली रेल्वेची सेवा मंगळवारपासून पुन्हा सुरू करण्यात आली आहे. सध्या केवळ १५ गाड्या चालविल्या जाणार आहेत. त्याचबरोबर कोरोनाचा धोका लक्षात घेता या विशेष रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांना ‘आरोग्य सेतू मोबाइल अ‍ॅप’ डाऊनलोड करणे बंधनकारक केले आहे.


भारतीय रेल्वेने जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे की, आज सुरू होणार्‍या विशेष गाड्यांमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी त्यांच्या मोबाईलमध्ये आरोग्य सेतु अ‍ॅप डाऊनलोड करणे आवश्यक आहे. कोरोना विषाणूशी संबंधित माहिती देण्यासाठी काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारने ‘आरोग्य सेतु अ‍ॅप’ सुरू केले होते. आरोग्य सेतू मोबाइल अॅप आतापर्यंत ९.८ कोटी लोकांनी डाउनलोड केले आहे. या अ‍ॅपचे वापरकर्ते एखाद्या संक्रमित व्यक्तीशी जवळच्या संपर्कात येत असल्यास अॅप वापरकर्त्याला सतर्क करते.


रेल्वे मंत्रालय आणि आरपीएफने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये प्रवाश्यांनी ट्रेन पकडण्यासाठी किमान ९० मिनिटांपूर्वी स्थानकावर हजर राहण्यास सांगितले आहे. केवळ कन्फर्म ‘ई-तिकीट’ असणारे प्रवासी पॅसेंजर ट्रेनने प्रवास करतील याकडे बारकाईने लक्ष दिले जाणार आहे. प्रवासाच्या पूर्वी सर्व प्रवाशांची सक्तीने आरोग्य चाचणी केली जाईल त्यामधून कोरोनाचे कोणतेही लक्षण नसल्याच प्रवाशांना गाडीमध्ये चढायची परवानगी असेल. स्टेशन आणि कोचमध्ये प्रत्येक प्रवाशाला एंट्री आणि एक्झिट पॉंईंटवर हॅन्ड सॅनिटायझर दिले जाईल. तसेच प्रवासादरम्यान मास्क परिधान करणे सक्तीचे असणार आहे.


प्रवास दरम्यान गाड्यांमध्ये खाद्यपदार्थ उपलब्ध होणार नाही किंवा प्रवाशी बाहेरूनही खाद्यपदार्थ मागवू शकणार नाहीत. तिकिटावरदेखील कॅटरिंग फी आकारली जाणार नाही. या प्रवासात नागरिकांना आपापल्या खाण्यापिण्याची सोयस्वतः करावी लागणार आहे तसेच चादर, ब्लॅंकेट असे साहित्य सुद्धा आपापले घेऊन यायचे आहे. नेहमीप्रमाणे या सुविधा रेल्वेतर्फे यावेळेस पुरवल्या जाणार नाहीत.
@@AUTHORINFO_V1@@