वंदे भारत अभियान : ६०३७ भारतीय मायदेशी परतले !

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-May-2020
Total Views |

vande bharat abhiyan_1&nb




नवी दिल्ली
: नागरी उड्डयन मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, 'वंदे भारत' अभियानाअंतर्गत 'एअर इंडिया' आणि त्याची सहाय्यक 'एअर इंडिया एक्सप्रेस' ७ मे २०२०पासून सुरू झालेल्या पहिल्या टप्प्यात आतापर्यंत ३१ उड्डाणांतर्गत ६०३७ भारतीयांना मायदेशी परत आणण्यात यश आले आहे. एअर इंडिया आणि त्याची सहाय्यक एअर इंडिया एक्सप्रेस 'वंदे भारत' अभियानाअंतर्गत १२ देशांमध्ये ६४ उड्डाणे केली जात आहेत. यापैकी ४२ उड्डाणे एअर इंडियाद्वारे चालविले जातात आणि २४ उड्डाणे एअर इंडिया एक्सप्रेसद्वारे चालविली जातात. या १२ देशांमध्ये अमेरिका, लंडन, बांगलादेश, सिंगापूर, सौदी अरेबिया, कुवेत, फिलिपिन्स, युएई आणि मलेशियाचा समावेश आहे. नागरी उड्डयन मंत्रालयाने दिलेल्या महितीनुसार, परदेशात अडकलेल्या १४,८०० भारतीयांना पहिल्या टप्प्यात परत आणले जाईल. भारत सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले. परदेशात अडकलेल्या भारतीय नागरिकांच्या परतीसाठी सात मेपासून टप्प्याटप्प्याने विशेष उड्डाणे सुरू करण्यात येतील व १३ मेपर्यंत ही उड्डाणे सुरू राहतील अशी घोषणा सरकारने केली.


पुढील आठवड्यात उड्डाणांची संख्या वाढेल


कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रभावामुळे विमान प्रवासी वाहतुकीवर निर्बंध टाकण्यात आले होते. अमेरिका तसेच इतर देशात मोठ्या संख्येने अडकलेल्या भारतीय विद्यार्थी आणि भारतीय नागरिकांची संख्या पाहता येत्या आठवड्यात विमानांची संख्या वाढवली जाऊ शकते. अमेरिकेत भारतीय दूतावास आणि वाणिज्य दूतांनी मायदेशी परतण्याच्या विचारात असलेल्या भारतीयांच्या याद्या तयार करण्यास सुरवात केली. ऑनलाईन नोंदणीद्वारे या याद्या तयार केल्या जात आहे.
@@AUTHORINFO_V1@@