हाँगकाँगमधील कोरोना नियंत्रणाचा खास ‘रिस्टबँड’ पॅटर्न!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-May-2020
Total Views |

HongKong_1  H x



रिस्टबँड असल्याने कुणीच मोडू शकत नाही आयसोलेशनचे नियम; कोरोनाही नियंत्रणात


हाँगकाँग : कोरोना विषाणूचा पहिला रुग्ण डिसेंबर २०१९ मध्ये चीनमध्ये आढळले होता. त्यानंतर हा व्हायरस जगभरात पसरला. यामुळेच जगभरात लॉकडाउन घोषित करावे लागले आहे. परंतु, एकेकाळी कोरोनाचे केंद्र मानल्या जाणाऱ्या चीनच्या वुहान शहरापासून अवघ्या ९१९ किमी दूर हाँगकाँगमध्ये लॉकडाउन नाही. तरीही या शहरात कोरोना नियंत्रणात आहे. काही ठिकाणी ठराविक निर्बंध वगळता येथे सर्व काही सुरळीत सुरू आहे. ७४ लाख लोकसंख्या असलेल्या हाँगकाँगमध्ये सध्या लॉकडाउन पूर्णपणे हटवण्यात आले आहे. त्यामुळेच हाँगकाँगचे उदाहरण जगभरात दिले जात आहे.


एप्रिल महिन्यात एक जर्नल 'द लँसेट' मध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार, नॉन फार्मासिटिकल इंटरव्हेंशन जसे की, सीमा प्रतिबंध, क्वारंटाइन, आयसोलेशन, डिस्टन्सिंग आणि लोकांच्या वागण्यातील बदल यामुळे कोरोनाचा फैला रोखण्यात हाँगकाँग यशस्वी ठरले. चीनमध्ये व्हायरसचा पत्ता लागताच हाँगकाँगने सीमा सील केल्या होत्या. चीनमध्ये ये-जा पूर्णपणे बंद करण्यात आली.हाँगकाँगमध्ये बहुतांश लोक मास्क वापरतात. मास्क शिवाय कुणीच दिसत नाही. अधिक गर्दी असलेल्या ठिकाणी सुरुवातीपासूनच लोक मास्क वापरताना दिसून येतात. पहिल्या दिवसापासूनच येथे सक्तीने नियम पाळण्यात आले. आता लोक मेट्रोमध्ये सुद्धा बिंधास्त प्रवास करत आहेत. ते केवळ मास्क वापरून वेळोवेळी सॅनिटायजरने हात स्वच्छ करत असतात. लिफ्ट किंवा कुठल्याही सार्वजनिक गोष्टीचा वापर करताना ते टीशू पेपर वापरतात. हे टीशू पेपर इकडे-तिकडे उगीच फेकून दिले जात नाहीत. अॅपच्या माध्यमातून लोकांना मदत केली जाते.


हाँगकाँग सरकारने तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर केला. क्वारंटाइनमध्ये लोकांच्या हातात बँड बांधण्यात आले होते. त्यामध्ये जीपीएस आणि अत्याधुनिक ट्रॅकिंग सिस्टिम होते. यातून लोक कुठे आहेत याची प्रशासनाकडे माहिती होती. अशात आयसोलेशनचे नियम कुणीही मोडू शकत नव्हते. कुणी मोडल्यास इतर लोक त्याचा व्हिडिओ करून प्रशासनाला माहिती देत होते. कोरोनामुळे इथले शाळा, क्लब, जिम आणि पार्लर सुद्धा बंद करण्यात आले. पण, पूर्णपणे लॉकडाउन कधीच लागू करण्यात आला नाही.


व्हेपोराइज्ड हायड्रोजन परॉक्साइड रोबोट्सपासून इंटेलिजेंट स्टेरलायजेशन रोबोट्सपर्यंतचा वापर विमानतळ, रेल्वे स्टेशनवर करण्यात आला. यात यूव्ही लाइट, ३६० डिग्री स्प्रे नोझल्स आणि एअर फिल्टर्सचा वापर करून जर्म्स आणि व्हायरस नष्ट करण्यात आले. यासोबतच फुल बॉडी डिसइंफेक्शन चॅनल फॅसिलिटी, ऑटोनॉमस क्लीनिंग रोबोट्स देखील वापरण्यात आले. त्यामुळेच, कोरोना विरोधात हाँगकाँग मॉडेल एक आदर्श मॉडेल मानले जात आहे.
@@AUTHORINFO_V1@@