शेअर बाजारही कोरोनाच्या विळख्यात

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-May-2020
Total Views |
BSE _1  H x W:
 
 
मुंबई : शेअर बाजारात सोमवारी दिवसभर उतारचढाव दिसून आले. बहुतांश काळ तेजीतच सुरू होते. अखेरच्या क्षणी वित्तीय सेवा क्षेत्रातील बलाढ्य कंपन्यांच्या शेअर्सची जोरदार विक्री झाल्याने बाजार गडगडले. सेन्सेक्स ८१.४८ अंशांनी खाली घसरत ३१हजार ५६१.२२ अंकांवर थांबला. निफ्टी १२.३० अंकांनी घसरत ९ हजार २३९ अंकांवर पोहोचला. ऑटो सेक्टरमध्ये तेजी दिसून आली. यामुळे इंट्रा डेमध्ये निफ्टीवर ऑटो इंडेक्स ४ टक्क्यांनी वाढलेला दिसला. आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये १०८४ शेअर्सनी वृद्धी नोंदवली. तर १२८० शेअर्सनी नुकसान झेलले. १८६ शेअरची किंमत बदलली नाही.
 
 
 
ऑटोमोबाइल क्षेत्रात निफ्टी ५० इंडेक्समध्ये सहा टक्क्यांची वृद्धी नोंदवणारा हिरो मोटोकॉर्प टॉप गेनर ठरला. तो २,०८८२ रुपयांवर बंद झाला. टाटा मोटर्स, बजाज ऑटो आणि मारुती सुझूकीदेखील सकारात्मक स्थितीत पोहोचला. आज नफा कमावणाऱ्या इतर शेअर्समध्ये भारती इन्फ्राटेल, ग्रासीम इंडस्ट्रीज आणि वेदान्ताचा समावेश आहे. बँकिंग क्षेत्रात आजही वाईट स्थिती दिसली. निफ्टी बँक आणि निफ्टी फिन सर्व्हिसेस दोन्हीही १.५ टक्क्यांनी घसरल्या.
 
 
 
कोव्हिड-१९ च्या उद्रेकामुळे वित्तीय संस्थांनी कर्ज न चुकवणाऱ्यांमध्ये वाढ होईल, असा अंदाज वर्तवला आहे. २०२० च्या चौथ्या तिमाहीत कंपनीच्या निव्वळ नफ्यात २६ टक्के म्हणजेच १,२२१.३६ कोटी रुपयांची वाढ झाल्याच्या वृत्तानंतर आयसीआयसीआय बँकेच्स मूल्य ४.६ टक्क्यांनी घसरले. तिचा समावेश टॉप लूझर्समध्ये झाला. बँकिंग क्षेत्रातील इतर लूझर्समध्ये कोटक महिंद्रा बँक, एचडीएफसी बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया आणि इंडसइंड बँकेचा समावेश आहे. वित्तीय संस्थाच्या शेअर्सची विक्री ही बाजाराच्या घसरणीला कारणीभूत ठरत आहे, असे मत एंजल ब्रोकींगचे प्रमुख सल्लागार अमरसिंह देव यांनी व्यक्त केले आहे.




@@AUTHORINFO_V1@@