भाजपने उमेदवार बदलला : 'या' नेत्याला संधी !

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-May-2020
Total Views |
BJP _1  H x W:





मुंबई : विधानपरिषद निवडणूक बिनविरोध होणार, हे निश्चित झाले, असे महाविकास आघाडी मानत असली तरीही निवडणुकीतील उत्सुकता अद्याप संपली नाही. भाजपने ऐनवेळी विधानपरिषद निवडणुकीसाठी दिलेला चौथा उमेदवार बदलला आहे. भाजपकडून आता अजित गोपचडे यांच्याजागी रमेश कराड निवडणूक उमेदवार असणार आहेत. रमेश कराड यांनी सोमवारी विधानपरिषद निवडणुकीसाठी डमी उमेदवार म्हणून भाजपकडून अर्ज दाखल केला. त्यानंतर आता अजित गोपचडे यांचा अर्ज मागे घेऊ रमेश कराड यांची उमेदवारी कायम केली. रमेश कराड यांनीच या वृत्ताला दुजोरा दिला आहे.



ते म्हणाले, "महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या नऊ जागेसाठी सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांच्या सूचनेनुसार भारतीय जनता पक्षातर्फे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत अधिकृतपणे मी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी भाजपाचे युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर आणि प्रदीप पाटील खंडापूरकर हे उपस्थित होते.'
 
 
 
 
भाजपकडून कोणते चार उमेदवार मैदानात ?
 
विधानपरिषद उमेदवारीसाठी भाजपने डॉ. रमेश कराड, प्रवीण दटके, गोपीचंद पडळकर आणि रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे.
@@AUTHORINFO_V1@@