४ हजार मदरशांतील ६० हजार मुलांचा खर्च हजार कोटी रुपये :अनुदानाची मागणी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-May-2020
Total Views |
Madarsa_1  H x
 
 




लॉकडाऊनमुळे तेलंगाणा सरकारकडे मागितले अनुदान



नवी दिल्ली : कोरोना विषाणूमुळे लागू केलेल्या लॉकडाऊनचा परिणाम मदरशांवरही जाणवू लागला आहे. तेलंगणातील ४ हजार मदरशांमध्ये रमजान काळात मिळणारे दान आणि देणगी स्वरुपातील रक्कम येणे बंद झाले आहे. त्यामुळे अशा ६० हजार मुलांच्या पालनपोषणाचा प्रश्न उभा राहिला आहे. एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, एकट्या तेलंगणा राज्यात एकूण ४ हजार मदरसे आहेत. त्यापैकी ६० हजार मुलांना इस्लामची शिकवण दिली जाते. एकूण सर्व व्यवस्था पाहण्यासाठी हजार कोटींचा खर्च येतो.


लॉकडाऊनच्या काळात मदरसे बंद होण्याच्या मार्गावर आहेत. याची देखभाल करणारे आणि व्यवस्थापन करणाऱ्यांना यासाठी पैसा गोळा करणे कठीण जात आहे. लॉकडाऊन आणखी वाढला आणि या प्रश्नावर तोडगा निघाला नाही, तर मुलांना त्यांचे पालक मदरशात पाठवणार नाहीत, अशीही चिन्हे आहेत. 

राज्यात धर्माची शिकवण देणारे संस्थान म्हणून जामिया निजामिया याची ओळख आहे. तिथे हजार मुले इस्लामची शिकवण घेतात. वर्षाचा गाडा हाकण्यासाठी इथे सहा कोटी इतकी रक्कम लागते. मदरशांकडे स्वतःची मिळकत किंवा उत्पन्नाचा स्त्रोत नाही. सरकारतर्फे मदत मिळाली नसल्याने केवळ मिळणाऱ्या मदतीद्वारेच रोजचे व्यवहार पार पाडले जात आहेत.
एका अहवालानुसार, जमियत उल डॉ. मुफ्तिया रिजवाना परवीन म्हणतात, मुली आणि स्त्रियांसाठी बनलेले त्यांचे संस्थान मुस्लीम समुदायातर्फे दिल्या जाणाऱ्या मदतीवरच चालते. रमजानच्या महिन्यात मिळणाऱ्या मदतीतून ८० टक्के खर्च भागवला जातो. याशिवाय जकात आणि दान एकत्रित करण्यासाठी काही प्रतिनिधींना ठिकठिकाणी पाठवले जाते. मशिदीबाहेर काऊंटर लावून दान देण्यासाठी आवाहन केले जाते. लॉकडाऊनमुळे तसे करता येत नाही. 

संस्थांनाच्या प्रमुखांनी दिलेल्या माहितीनुसार, लॉकडाऊनमुळे दानशूर व्यक्तींचा सर्व पैसा मदरशांना दान करण्याऐवजी गरीब मजूरांना जेवण देणे, त्यांना घरपोच करण्यासाठी लागला आहे. लॉकडाऊन उठल्यानंतरच आम्हालाा मदत मिळू शकेल. तेलंगाणात आर्थिक संकटात सापडलेल्या काही मदरशांना चालवणे कठीण होऊन बसले आहे. त्यामुळे हे मदरसे बंद होण्याच्या मार्गावर आहेत. इथल्या लोकांनी सरकारकडे मदतीची हाक दिली आहे.








@@AUTHORINFO_V1@@