७५२ ठाणेकर कोरोनाच्या विळख्यात

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-May-2020
Total Views |
thane_1  H x W:
 
 
 
 

एका दिवसात ४० नव्या रुग्णांची भर

ठाणे : शहरातील कोरोनाग्रस्‍तांचा आकडा सोमवारी चाळीसने वाढला. शहरातील करोनाग्रस्‍तांचा आकडा साडेसातशे पार करत ७५२ इतका झाला आहे. आज दिवसभरात तीन रूग्‍णांचा मृत्‍यु झाला. शहरात आत्‍तापर्यंत २२४ रूग्‍ण बरे होऊन परतले असुन ४९९ रूग्‍ण संख्‍या उपचार घेत आहेत. तर २९ जणांचा आजपर्यंत दुर्देवी मृत्‍यु झाला आहे.
 
 
 
रोज चाळीशीच्‍या पुढे रूग्‍ण आढळण्‍याचा विक्रम आजही कायम राहिला. लोकमान्‍य आणि नौपाडा कोपरी प्रभाग समितीत प्रत्‍येकी आठ रूग्‍ण आढळून आले आहेत. यामुळे आता लोकमान्‍य प्रभाग समितीचा आकडा हा वाढुन आता १७८ इतका झाला आहे. तर नौपाडा कोपरी प्रभाग समितीत हा आकडा आता ७३ इतका पोहचला आहे.
 
 
 
दुर्देवाने शहरात आत्‍तापर्यंत २९ रूग्‍णांचा मृत्‍यु झाला आहे. आज तीन रूग्‍ण करोनाने मृत्‍युमुखी पडले आहेत. समाधानाची बाब म्‍हणजे शहरातील २२४ रूग्‍ण आत्‍तापर्यंत बरे होईन घरी परतले आहेत. व आता केवळ ४९९ रूग्‍ण हे ठाण्‍यातील कोवीड रूग्‍णालयात उपचार घेत आहेत.
 
 
 
मंगळवारी कोरोना ग्रस्‍तांचा आकडा कमी झाला असला तरी चाळीसच्‍या घरात रूग्‍ण आढळण्‍याची परंपरा शहरात कायम आहे. परंतु गांभीर्याची बाब म्‍हणून केवळ हॉटस्‍पॉट भागात रूग्‍ण न आढळतात रोजच शहरातील प्रत्‍येक प्रभाग समितीत रूग्‍ण आढळून येत आहेत. माजीवडा प्रभाग समितीत ३, वर्तकनगर प्रभाग समितीत २, उथळसर प्रभाग समितीत ६, वागळे प्रभाग समितीत ४, कळवा, मुंब्रा व दिवा प्रभाग समितीत प्रत्‍येकी ३ रूग्‍ण आढळून आले आहेत.
 
 
 
शहरातील माजिवडा प्रभाग समितीत रूग्‍णांचा आकडा आता ४१, वर्तकनगर प्रभागात ४९, उथळसर प्रभाग समितीत ६२, वागळे प्रभाग समितीत १३२, कळवा प्रभाग समितीत ६७, मुंब्रा प्रभाग समितीत १०६, दिवा प्रभाग समितीत ४४ इतका पोहचला आहे. शहरातील सर्वच प्रभाग समितीत आज रूग्‍ण आढळून आले आहेत.





@@AUTHORINFO_V1@@