कोरोना कहर (भाग-८)

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-May-2020
Total Views |


mask_1  H x W:

 


कोरोना व्हायरसचा संसर्ग हा जरी मुख्यत्वे करून श्वसनसंस्थेशी निगडित असला तरी त्याचा परिणाम हा माणसाच्या संपूर्ण शरीरावरच नव्हे, तर मनावरसुद्धा होत असतो. जसे आधी आपण पाहिले की, छातीशी, फुप्फुसांशी व श्वसनसंस्थेशी निगडित असलेली सर्व लक्षणे ही अभ्यासली जातात. त्याचबरोबरीने या साथीच्या आजाराची सामान्य लक्षणेसुद्धा अभ्यासून त्यानुसार होमियोपॅथीचे औषध ठरवले जाते.


 

संपूर्ण साथीला बरे करण्यासाठी ‘जिनस एपिडेमीकस्’ (Genus Epidemicus) शोधले जाते. त्यात असे दिसून येतेच की,


) ‘कोविड-१९’ हा प्रखर संसर्गजन्य रोग आहे.
) हा रोग फार जलदगतीने पसरतो.
) या रोगाचा संसर्ग वयस्क लोकांना, तसेच ज्या लोकांना मधुमेह, हृदयविकार तसेच काही इतर मोठे आजार आहेत, अशांमध्ये प्रखर लक्षणांच्या आधारे दिसून येतो.
) ज्या लोकांची रोगप्रतिकारकशक्ती फार कमी किंवा कमकुवत आहे, अशा लोकांना या आजाराची लागण प्रामुख्याने होते.
) या आजाराचा वेग हा सुरुवातीला संथ वाटत असला तरी नंतर मात्र अतिशय वेगाने हा आजार शरीरात गंभीर गुंतागुंतीचे आजार निर्माण करतो.


यावरून होमियोपॅथीक डॉक्टरांना असे औषध शोधायचे आहे की, ते सर्व निकष पूर्ण करेल, तरच हा साथीचा आजार नियंत्रणात यायला मदत होते. शारीरिक लक्षणांबरोबर होमियोपॅथीमध्ये मानसिक लक्षणांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. माणसाच्या संपूर्ण मानसिकतेचा शरीरावर सतत परिणाम होत असतो. ‘कोविड-१९’च्या साथीचेच बघायचे झाले, तर या साथीच्या आजारांमुळे माणसाच्या, पर्यायाने संपूर्ण समाजाच्या मानसिकतेत प्रचंड बदल झालेला आहे. काही महत्त्वाची मानसिक लक्षणे जी समाजात दिसून येत आहेत, ती अशी-


) जवळजवळ प्रत्येक माणसाला ‘कोविड-१९’ या आजारामुळे संसर्गजन्य आजाराची प्रचंड भीती वाटत आहे.
) जिथे-तिथे जंतुसंसर्ग तर होणार नाही ना, याची भीती प्रत्येकाला अस्वस्थ करते.
) आपल्याला स्वतःला काही इजा तर होणार नाही ना, याची भीती मनाला खात राहाते.
) मनामध्ये वाढत जाणारी संशयीवृत्ती, एकमेकांकडे संशयाने पाहण्याची वृत्ती वाढत आहे.
) स्वतःपुरते पाहण्याची वृत्ती दिसून येत आहे.
) सतत कोणीतरी मागावर असल्याची भावना (सतत वाटणारी कोरोनाची भीती)
) मानसिक छळवणूक झाल्याची भावना
) मानसिकदृष्ट्या हतबल असल्याची भावना
) मर्यादित वावरामुळे होणारी चिडचिड
१०) साध्या सर्दीच्या किंवा साध्या तापाच्या लक्षणांचीदेखील भीती. एखादी शिंक जरी आली तरी लोक घाबरत आहेत.
११) सामाजिक असुरक्षिततेची भावना
१२) स्वतःला असणारी प्रचंड असुरक्षितता लपवून दुसर्‍यांना मोठे उपदेश करणार्‍यांची मानसिकता.
१३) भविष्याबद्दल अनिश्चितता
१४) सतत कुठून तरी आपल्यावर हल्ला होईल, अशा प्रकारची असुरक्षितता. (हल्ला म्हणजे कोरोनाचा संसर्ग)
१५) आजूबाजूच्या लोकांकडून व वातावरणातून त्रास होतोच की काय, अशी भावना
१६) संसर्ग झालेल्या माणसाला अस्पृश्य समजून त्याला वाळीत टाकण्याची मानसिकता
१७) आजूबाजूला जग आपले शत्रूच आहेत, अशा पद्धतीची संशयधार्जिणी मानसिकता
१८) आपल्याकडील अत्यावश्यक साठा कमी पडेल किंवा संपेल की काय, याची भीती
१९) अचानकपणे मृत्यू ओढवले, याची भीती
२०) अचानकपणे वाढलेली धार्मिकतेची भावना आणि प्रचंड वाढलेला भयगंड या व अशा अनेक मानसिक लक्षणांचा अभ्यास करावा लागेल. या लक्षणांचा अभ्यास करताना कवी ग्रेस यांनी लिहिलेल्या कवितेच्या ओळी आठवतात-


‘भय इथले संपत नाही
मज तुझी आठवण येते


पुढील भागात आपण होमियोपॅथीची कुठली औषधे ‘कोविड-19’ वर उपयुक्त आहेत, त्याची सविस्तर माहिती पाहूया. (क्रमशः)
 

- डॉ. मंदार पाटकर

(लेखक एम.डी होमियोपॅथी आहेत.)

 
 
@@AUTHORINFO_V1@@