नायकूच्या पिलावळीच्या फुकाच्या धमक्या !

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-May-2020   
Total Views |


riyaz naikoo_1  


रियाझ नायकू याची हत्या झाल्याचे कळताच हिजबुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेत एकच खळबळ माजली आहे. रियाझ नायकूच्या हत्येचा बदला घेण्याची भाषा केली जाऊ लागली आहे. हिजबुल मुजाहिद्दीन संघटनेचा प्रमुख सय्यद सलाहुद्दिन याने तर नायकूच्या हत्येनंतर सर्व काश्मीर बेचिराख करण्याची धमकी दिली आहे.


संपूर्ण देशाप्रमाणे काश्मीरमध्येही कोरोनाचा प्रादुर्भाव झाला असतानाच तेथील प्रशासन आणि सुरक्षा दलांना कोरोनाबरोबरच दहशतवाद्यांना तोंड द्यावे लागत आहे. गेल्या आठवड्यात काश्मीरमधील दहशतवादाविरुद्ध सुरु असलेल्या लढाईत सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले. गेली आठ वर्षे फरार असलेला रियाझ नायकू हा दहशतवादी गेल्या आठवड्यात पुलवामा जिल्ह्यामध्ये सुरक्षा दलांसमवेत झालेल्या चकमकीत मारला गेला. कोण होता हा रियाझ नायकू? हिजबुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या असलेला रियाझ नायकू हा ‘ए प्लस प्लस’ दहशतवादी होता आणि त्याला पकडण्यासाठी १२ लाखांचे बक्षीस घोषित करण्यात आले होते. हिजबुल मुजाहिद्दीन संघटनेचा म्होरक्या यासीन यट्टू २०१७ साली चकमकीत मारला गेल्यानंतर त्याची जागा नायकूने घेतली होती. रियाझ नायकूच्या हत्येचे पडसाद काश्मीर खोर्‍यामध्ये उमटू नयेत म्हणून लगेचच त्या प्रदेशातील कायदा आणि व्यवस्था आणखी भक्कम करण्यात आली. काश्मीरमध्ये भारतविरोधी तत्त्वे अजूनही मोठ्या प्रमाणात कार्यरत असल्याने सुरक्षा दलांना ही पावले टाकावी लागली. हिजबुल मुजाहिद्दीन या संघटनेचा प्रभाव काश्मीर खोर्‍यात वाढविण्यास नायकूने मोठ्या प्रमाणात हातभार लावला होता, असे सांगण्यात येते. खंडण्या गोळा करणे, आपल्याविरुद्ध काम करणार्‍यांच्या हत्या करणे याबद्दल या दहशतवाद्याची ख्याती होती. समाज माध्यमांचा प्रभावी वापर करून रियाझ नायकू काश्मीरमधील तरुणांना चिथावणी देण्याचे उद्योग करीत असे.
 
 
रियाझ नायकू याची हत्या झाल्याचे कळताच हिजबुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेत एकच खळबळ माजली आहे. रियाझ नायकूच्या हत्येचा बदला घेण्याची भाषा केली जाऊ लागली आहे. हिजबुल मुजाहिद्दीन संघटनेचा प्रमुख सय्यद सलाहुद्दिन याने तर नायकूच्या हत्येनंतर सर्व काश्मीर बेचिराख करण्याची धमकी दिली आहे. सय्यद सलाहुद्दिन याचे नाव सय्यद मोहम्मद युसुफ शाह असे आहे. काश्मीरचा मुद्दा म्हणजे एक ठिणगी असून त्यामुळे संपूर्ण क्षेत्रात वणवा भडकेल, असा इशारा त्याने दिला आहे. पण, काश्मीरमधून ‘कलम ३७०’ रद्द केल्यानंतर आणि तेथे जी शासन व्यवस्था निर्माण करण्यात आल्यानंतर अतिरेक्यांच्या पोकळ धमक्यांना कोणी घाबरत नाही, हे त्या यंत्रणेने अनेकवेळा सिद्ध करून दाखविले आहे. दहशतवादी कारवाया करणार्‍यांना जशास तसे उत्तर देऊन त्या संघटनांचे कंबरडे मोडण्याचे प्रयत्न सुरक्षा दलांनी चालविले आहेत. रियाझ नायकू याची हत्या हा त्या कारवाईचा एक भाग आहे, हे हिजबुल मुजाहिद्दीन संघटनेच्या अतिरेक्यांच्या कधी लक्षात येणार? काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग असल्याने तो खंडित करण्याची स्वप्ने पाहण्याचे आणि पाकिस्तानच्या तालावर नाचण्यामध्ये या हिजबुलच्या दहशतवाद्यांनी सोडून देण्यातच त्यांचे हित आहे. वेळीच शहाणे न झाल्यास त्यांचीही गत रियाझ नायकू यांच्याप्रमाणे आज ना उद्या झाल्याशिवाय राहणार नाही हे नक्की!
 
सय्यद सलाहुद्दिन हा दहशतवादी पाकव्याप्त काश्मीरमध्ये दडून बसला आहे. तेथून त्याने नायकूच्या हत्येबद्दल शोक व्यक्त केला आहे. गेल्या जानेवारीपासून काश्मीरमध्ये ८० अतिरेकी मारले गेले असल्याचे; तसेच काश्मीरमध्ये भारताची शक्ती वाढली असल्याचे त्याने या संदर्भातील आपल्या संदेशात म्हटले आहे. रियाझ नायकू आणि त्याचा साथीदार अदिल अहमद यांच्या हत्येमुळे हिजबुल मुजाहिद्दीन संघटनेला जबरदस्त हादरा बसला आहे, असे एका वरिष्ठ पोलीस अधिकार्‍याने म्हटले आहे. नायकूच्या हत्येमुळे सय्यद सलाहुद्दिन याचा जो तीळपापड झाला आहे, त्यावरून याची प्रचीती येतेच! दरम्यान, काश्मीरमध्ये एका कुप्रसिद्ध दहशतवाद्याची जी हत्या झाली, त्याचे पडसाद देशाच्या दुसर्‍या टोकास असलेल्या केरळ राज्यात उमटावेत हे लक्षात घेता दहशतवादी संघटनेची पाळेमुळे देशाच्या विविध भागांमध्ये किती खोलवर रुजत चालली आहेत, याची कल्पना यावी. रियाझ नायकू याच्या हत्येनंतर केरळमध्ये जमात-ए-इस्लामी या संघटनेशी संबंधित असलेल्या एका तरुणाने, “आमचे काश्मिरी तरुण चोवीस तासांच्या आत या हत्येचा बदला घेतील,” अशी प्रतिक्रिया फेसबुक पेजवर पोस्ट केली. या देशात राहणारी व्यक्ती असे देशद्रोही भाष्य कसे काय करू शकते? नजी मेहरादाद नावाच्या तरुणाने हे देशद्रोही विचार आपल्या फेसबुक पेजवरून व्यक्त केले आहेत. त्याच्याविरुद्ध देशद्रोहाच्या आरोपांखाली खटला भरण्यात यावा, अशी मागणी करण्यात येत आहे. नजी मेहरादाद याने जी पोस्ट टाकली आहे त्याविरुद्ध कारवाई करण्याची मागणी राष्ट्रवादी शक्तींनी केली आहे. पण, दुसरीकडे, त्याच्या त्या कृतीचे समर्थनही करणारे महाभागही आपल्या देशातच आहेत. डाव्या आणि इस्लामी जिहादी विचारांचा प्रभाव केरळच्या काही भागात वाढत चालला असल्यानेच नजी मेहरादादसारखे देशद्रोही तरुण रियाझ नायकूची बाजू घेताना दिसत आहेत. अशा प्रवृतींना, मग त्या काश्मीरमधील असोत वा केरळमधील, त्यांना कसलीही दयामाया न दाखविता ठेचूनच काढायला हवे!
 
 
कमल हसनला झालेय तरी काय?
 
 

kamal hasan_1   
 

काही महाभागांना आपण हिंदू धर्म, त्या धर्मातील देवदेवता आणि संत यांच्यावर टीका केली की खूप धन्य वाटायला लागते. अशा लोकांच्या रांगेत कमल हसन या प्रसिद्ध अभिनेत्याचाही समावेश झाला आहे. संतकवी आणि कर्नाटक संगीतात आदर्श असलेले संत त्यागराज यांचा कमल हसन याने अत्यंत खालच्या भाषेत उपमर्द केला आहे. कमल हसन आणि त्यांचा आणखी एक हिंदुद्वेष्टा नट विजय सेतूपती या दोघांनी, संत त्यागराज यांचा उल्लेख ‘भिकारी’ असा केला आहे. हिंदू धर्मातील संतमहंत यांच्याबद्दल कोणीही, काहीही बोलावे म्हणजे अतीच झाले! आपण एका राजकीय पक्षाचे नेते झालो म्हणजे काहीही बोलण्यास मोकळे, असे कमल हसन यास वाटले की काय? कमल हसन आणि विजय सेतूपती या दोघांनी संत त्यागराज यांचा जो अवमान केला आहे, त्याबद्दल या दोघांनी माफी मागावी, अशी मागणी संत त्यागराज भक्तांकडून आणि अनेक संगीतप्रेमीकडून करण्यात येत आहे. संत त्यागराज हे उच्च कोटीचे ‘हरिदास’ होते आणि त्यांनी आयुष्यभर रामकथेचा प्रसार केला. असे असताना त्या महान संताचा ‘भिकारी’ असा उल्लेख व्हावा? हिंदू संतांची एवढी निंदानालस्ती कमल हसन यास करवलीच कशी? कमल हसन याने संत त्यागराज यांच्याबद्दल जे आक्षेपार्ह भाष्य केले आहे, त्याबद्दल न्यायालयात दाद मागण्यात आली आहेच. पण, कमल हसन याने अशा प्रकारचे वक्तव्य एखाद्या अन्यधर्मीय व्यक्तीबद्दल केल्याचे ऐकिवात नाही. आपणास भाषण स्वातंत्र्याचा अधिकार घटनेने दिला आहे म्हणून कोणाबद्दल काहीही बोलण्याचा अधिकार तुम्हास दिलेला नाही, हे कमल हसन यांनी चांगले लक्षात ठेवावे! हिंदू जनता आज ना उद्या कमल हसन यास त्याची जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही!

 
 
@@AUTHORINFO_V1@@