१७ मेनंतर लॉकडाऊन संपणार की वाढणार? ; सोमवारी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार पंतप्रधान

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-May-2020
Total Views |

narendra modi_1 &nbs
नवी दिल्ली : १७ मेनंतर लॉकडाऊन उठावयाचे की वाढवायचे? स्थलांतरित मजुरांना होणारा त्रास कसा थांबवायचा? कोरोनातील राज्यातील आढावा आणि चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडियोद्वारे संवाद साधणार आहेत. काही राज्यांनी प्रवासी स्थलांतरित मजुरांबाबत चिंता व्यक्त केली. या राज्यांनी प्रवासी मजुरांच्या घरवापसीमुळेच कोरोना विषाणू संक्रमणाचा धोका वाढत असल्याचे सांगितले.
 
 
कॅबिनेट सेक्रेटरी राजीव गौबा यांनी रविवारी सर्व राज्यांचे मुख्य सचिव आणि आरोग्य सचिव यांच्यासोबत व्हिडिओ द्वारे संवाद साधला. मिळालेल्या माहितीनुसार, अनेक राज्यांनी रेड, ग्रीन आणि ऑरेंज झोनसाठी आखण्यात आलेल्या नियमांवर प्रश्न उपस्थित केले आहेत. पंतप्रधान मोदींनी सर्वात आधी २५ मार्चपासून लॉकडाउनची घोषणा केली होती. पहिल लॉकडाउन २१ दिवसांसाठी होता. त्यानंतर १४ एप्रिलपासून १९ दिवसांसाठी वाढवण्यात आले. त्यानंतर ३ मे पासून हा लॉकडाउन आणखी १४ दिवसांसाठी वाढवून १७ मे पर्यंत करण्यात आल.
@@AUTHORINFO_V1@@