नवी दिल्ली : माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रविवारी प्रकृतीबाबत काही समस्या जाणवल्यानंतर मनमोहन सिंग यांना तातडीने एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. मनमोहन सिंग यांच्या छातीत दुखत असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे.