नवी दिल्ली : दिल्ली एनआरसी भाग रविवारी दुपारी भूकंपाच्या धक्क्यांनी हादरला. राष्ट्रीय भूकंपशास्त्रीय केंद्राने दिलेल्या माहितीनुसार, ३.५ रिक्टर स्केल इतक्या तीव्रतेचे भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाचे केंद्र गाझियाबाद असल्याचे सांगितले जात आहे.
देशाची राजधानी दिल्लीत २४ तासांत दोनदा भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. यापूर्वी भूकंपाच्या धक्क्यांची तीव्रता २.७ रिक्टर स्केल इतकी होती. दरम्यान, यात कुठलेही हानी झआलेली नाही. शनिवारी गुजराजच्या काही भागात भूकंपाचे धक्के जाणवले होते. याची तीव्रता ४ रिक्टर स्केल इतकी होती. जूनागड, पोरबंदर आणि सोमनाथ या भागात हे धक्के जाणवले. दिल्ली एनआरसी भागात यापूर्वीही अशाच प्रकारे भूकंपाचे धक्के जाणवले होते.
दरम्यान, दिल्लीत जोराचे वारे वाहू लागल्याची माहिती स्कायमेट या संस्थेने दिली आहे. अचानक जोरदार वारे वाहू लागल्याने नागरिकही संभ्रमात आहेत. दुपारी १२ वाजताच्या सुमारास आभाळ दाटून आले होते. त्यानंतर जोरदार वारे वाहत आहेत. इतक्या दिवसांनंतर शांत झालेल्या दिल्लीच्या प्रदुषणात अचानक वाढ झाली आहे. वारावरणात सगळीकडे धुलीकण पसरले आहेत. लॉकडाऊननंतर इतिहासात पहिल्यांदाच दिल्लीतील हवा शुद्ध आणि स्वच्छ झाल्याची नोंद होती.