उदयपूरचे शिव मंदिर जिथे रोज इरफान करायचे जल अर्पण, गाईला चारा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-May-2020
Total Views |

irrfan khan and his drive



वडिल म्हणायचे, "मुस्लीमांकडे ब्राम्हण जन्माला आलाय"

 
 
उदयपूर : बॉलीवुड अभिनेता इरफान खानच्या मृत्यूनंतरही काही कट्टरपंथींनी त्याला माफ केलेले नाही. इरफानने वेळोवेळी घेतलेल्या भूमीकेमुळे सतत त्यांच्या रोषाला सामोरे जावे लागत होते. दीर्घ आजाराने निधन झाल्यानंतरही इरफान खान कट्टरपंथींमध्ये तर्चेचा विषय बनला आहे. त्यासोबतच चाहत्यांनी त्याच्या काही जुन्या आठवणीही शेअर केल्या आहेत. इरफान मंदिरातही जायचा आणि गाईवरही प्रेम करायचा.
 
 
 
लहानपणापासूनच तो अशा मुक्त विचारांचा असल्याने त्याला वडिल म्हणायचे, "मुस्लीमांकडे ब्राम्हण जन्माला आलाय." मांसाहार करणे त्यांना फारसे आवडत नसायचे. वर्षभरापूर्वी इरफान खान आपल्या इंग्लिश मीडियम या चित्रपटाच्या शुटींगसाठी उदयपूरला गेले होते. इरफानचा ड्रायव्हर नरपत सिंह आसिया यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. शुटींगदरम्यान ४५ दिवस ते इरफान सोबत होते. याच दरम्यान इरफान त्यांच्या कडीया या मूळ गावीही पोहोचले होते. तिथल्या शेतांमध्ये फिरत, गाई-वासरांना जवळ घेऊन आपल्या बालपणीच्या आठवणी त्याज्या केल्या होत्या.
 
 
 
नरपत सिंह यांच्या आईने आराध्य श्रीनाथाची तसबीर त्यांना भेट दिली होती. त्यावेळी या तसबीरीला इरफानने कवटाळून त्यांचे आशीर्वाद घेतले होते. 'तुम्ही एकदम माझ्या आईसारखाच चहा बनवता,' असेही इरफान त्यांना सांगत असत. ड्रायव्हर नरपत सिंह म्हणतात, 'हॉटेलहून निघाल्यावर इरफान थेट महादेवाच्या मंदिरात जात असत, तिथे जल अर्पण करत, गाईला चारा देत कुत्र्यांना चपाती देत. त्यानंतरच ते शुटींगसाठी जात, असा त्यांचा नित्यनेम होता.'
 
 
 
त्र्यंबकेश्वर मंदिरात केले होते हवन
 
 
२०१८ साली लंडनमध्ये इरफान जेव्हा आपल्या आजाराशी झुंज देत होते तेव्हा ते दोन दिवसांसाठी भारतात आले होते. त्यावेळी दिवाळीत दोन दिवसांसाठी भारतात येऊन थेट नाशिकला त्र्यंबकेश्वरला गेले होते. तिथे हवनही केले होते. 'स्पॉटबॉय' या वेबसाईटने दिलेल्या माहितीत दोन दिवसांच्या या दौऱ्याची माहिती त्यांनी कुणालाही दिली नाही. त्यानंतर ते पुन्हा लंडनमध्ये परतले.
 
 
२०१८मध्ये इरफान यांना समजले कि त्यांना न्यूरो एंडोक्राइन ट्यूमर आहे. या आजाराशी झुंज देऊन ते पुन्हा भारतात परतलेही याच दरम्यान ते बॉलीवूडशी दूर राहिले. लंडनहून पूर्ण बरे झाल्यावर त्यांनी चित्रपटात काम करणे सुरू केले. २९ एप्रिल रोजी त्यांचा मृत्यू झाला. वर्सोवा येथील दफनभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मात्र, त्यांच्या जाण्यानंतरही काही कट्टरपंथी सतत त्यांच्याविरोधात वक्तव्ये करत आहेत ही खेदाची बाब आहे.
@@AUTHORINFO_V1@@