ठाण्‍यातील तरूणाई कोरोनाच्या विळख्‍यात

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-May-2020
Total Views |

thane_1  H x W:




ठाणे
: लॉकडाऊन गांभिर्याने न घेणाऱ्या दाट वस्‍तीतील तरूणाईला आता कोरोनाचा फटका जाणवायला लागला आहे. आज ठाण्यात आढळलेल्‍या ३४ रूग्‍णांपैकी २३ रूग्‍ण हे चाळीशीच्या आतले आहेत. तर बाधित रूग्‍णांमध्‍ये पुरूषांचे प्रमाण स्‍त्रींयांच्‍या तिप्‍पट आहे. घराबाहेर पडून नियम धाब्‍यावर बसवणारे तरूण कोरोनाबाधित व्‍यक्‍तीच्‍या संपर्कात आल्‍याने तरूणांमध्‍येच कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. वागळे आणि लोकमान्‍य नगर भागात प्रत्‍येकी १० रूग्‍ण आढळल्‍याने या दोन्‍ही भागातील रेड झोनमध्ये अधिक कठोर नियम असण्याची गरज आहे.




शिवशक्‍ती नगर, सी पी तलाव, विजय नगर, इंदिरानगर, संभाजी नगर, किंगकॉंग नगर, पोलिस लाइन, चेंदणी कोळीवाडा, चंदनवाडी, कौसा व भास्‍कर नगर येथे आज कोरोनाचे रूग्‍ण आढळले. प्रामुख्‍याने हे सगळे विभाग हे दाट वस्‍तीचे व झोपडपट्टीचे भाग म्‍हणून ओळखले जातात. पोलिस व प्रशासनाने वारंवार विनंती करूनही दाट वस्‍तीतील तरूणांनी दाखवलेली बे‍फीकीरी आता त्‍यांच्‍यावरच उलटली असुन कोरोनाच्या प्रादुर्भावास हे तरूण कारणीभूत ठरत आहेत.



वागळे प्रभागात आज एकुण १२ रूग्‍ण आढळले त्‍यातील १० रूग्‍ण हे एकट्या सी पी तलाव भागातील आहेत, लोकमान्‍य नगर व सावरकर नगर येथे देखील आज १० रूग्‍ण आढळले, नौपाडा कोपरी प्रभागात ४ रूग्‍ण, मुंब्रा कौसा भागात ४ रूग्‍ण, उथळसर, दिवा व मानपाडा भागात प्रत्‍येकी एक असे एकुण ३४ रूग्‍ण आज ठाण्‍यात आढळले. आज दिवसभरात एका रूग्‍णाचा मृत्‍यु झाला असून १० कोरोनारुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.
@@AUTHORINFO_V1@@