व्यर्थ न हो बलिदान

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-May-2020
Total Views |


maharshtra police_1 


तुमच्या जीवाच्या रक्षणासाठी उन्हातान्हात खडा पहारा देणार्या पोलिसांचा मनस्ताप वाढवू नये. त्यांच्या आरोग्याचे संतुलन ढळण्याचे तेही कारण असू शकते. पोलिसांमुळे आपण सुरक्षित आहोत, हे प्रत्येकाने ध्यानात असू द्या. त्यांच्या सूचनांचे पालन करा, तरंच त्या पोलीस कर्मचार्यांचे बलिदान सार्थकी लागेल.


पैशापेक्षाही माणसाच्या जीवाची किंमत मोठी आहे,” असे पंतप्रधान नरेंद्र मोदी लॉकडाऊनचा निर्णय जाहीर करताना म्हणाले होते. त्याची प्रचिती मुंबईचे पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी आणून दिली. कोरोनाची बाधा होऊ नये म्हणून त्यांनी ज्येष्ठ पोलीस कर्मचार्‍यांना घरीच राहण्याचे निर्देश दिले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनच्या नियमावलीचे नागरिकांनी पालन करावे म्हणून पोलीस रात्रंदिवस कठोर परिश्रम घेत आहेत. मात्र, मागील काही दिवसांपूर्वी तीन पोलीस जवानांचा मृत्यू झाला. ते तिघेही ज्येष्ठ कर्मचारी होते. त्यामुळे मुंबई पोलीस दलातील ५५ पेक्षा जास्त वयोमान असलेल्या पोलीस कर्मचार्‍यांना घरातच थांबण्याचे, तसेच ज्यांचे वय ५२ वर्षे आहे, परंतु ज्यांना अनेक व्याधी आहे, अशांनाही सुट्टी घेऊन घरी थांबण्याचे निर्देश पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी दिले. मुंबई पोलीस दलातील तीन हवालदारांना कोरोनामुळे प्राण गमवावे लागल्यानंतर परमवीर सिंग यांनी अत्यंत तातडीने हा निर्णय घेतला.



कोरोना विषाणूच्या संसर्गाचे नियंत्रण करण्यासाठी दिवसरात्र परिश्रम करणार्‍या वैद्यकीय कर्मचार्‍यांबरोबरच आता पोलीस कर्मचारीही कोरोनाचे बळी ठरत आहेत
, हे फार दुर्दैवी आहे. कोरोनाची लागण झाल्याने डॉक्टर बरे करतात, तर कोरोना पसरू नये, याची खबरदारी पोलीस घेत असतात. ते खबरदार असतात म्हणून डॉक्टरांवरील ताण हलका होतो, नाहीतर कोरोनाबाधित रुग्णांवर रस्तोरस्ती उपचार करण्याची वेळ आली असती. मुंबईतील कोरोनाबाधितांची संख्या लक्षात घेता ३ मेपर्यंत असलेला लॉकडाऊनअजून वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. लॉकडाऊनची मुदतवाढ ही माणसांचे जीव वाचावे यासाठीच आहे. या काळात अर्थव्यवस्था ढासळली तरी माणसांच्या जीवाची किंमत मोठी आहे. म्हणून नागरिकांनीही कारणाशिवाय घराबाहेर पडून आपला लाख मोलाचा जीव धोक्यात घालू नये आणि तुमच्या जीवाच्या रक्षणासाठी उन्हातान्हात खडा पहारा देणार्‍या पोलिसांचा मनस्ताप वाढवू नये. त्यांच्या आरोग्याचे संतुलन ढळण्याचे तेही कारण असू शकते. पोलिसांमुळे आपण सुरक्षित आहोत, हे प्रत्येकाने ध्यानात असू द्या. त्यांच्या सूचनांचे पालन करा, तरंच त्या पोलीस कर्मचार्‍यांचे बलिदान सार्थकी लागेल.



जय जय महाराष्ट्र!


महाराष्ट्र राज्य स्थापनेचा हीरकमहोत्सवी वर्धापन दिन आणि जागतिक कामगार दिन शुक्रवारी अत्यंत साधेपणाने साजरा झाला. याचे कारण कोरोनाविरोधात चालू असलेले युद्ध. ६० वर्षांपूर्वी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे
, या आंदोलनात्मक लढाईसाठी अवघा महाराष्ट्र रस्त्यावर उतरला होता आणि त्या लढ्यात शेतकरी आणि कष्टकरी अशा १० ६ लढवय्यांनी हौतात्म्य पत्करले होते. त्यांच्या हौतात्म्यामुळेच संयुक्त महाराष्ट्र राज्याची मुहूर्तमेढ रोवली गेली. तेव्हापासून महाराष्ट्र दिनमोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मात्र, यंदाचे हीरकमहोत्सवी वर्ष असतानाही महाराष्ट्र दिनाचा सोहळा अत्यंत साधेपणाने साजरा केला गेला. कारण, यावर्षी सारे जग कोरोना नावाच्या संकटाशी सामना करत आहे. या लढ्यात हजारो मृत्युमुखी पडले. भारताचा विचार केला तर महाराष्ट्रात आणि राजधानी मुंबईत मृत्युमुखी पडणार्‍यांची संख्या अधिक आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याच्या वेळी लोक रस्त्यावर येऊन लढत होते, तर कोरोना विरोधात घरात बसून लढा द्यायचा आहे. बाहेर पडला तो संपला, असे या लढ्याचे स्वरूप आहे. त्यामुळे यंदा सर्वांनी आपापल्या घरात थांबूनच महाराष्ट्र दिन साजरा केला. राज्यातील शेतकरी, कष्टकरी, कामगार, शिक्षक, व्यापारी, उद्योजक, पोलीस, सैनिक, डॉक्टर, साहित्यिक अशा सर्वांच्या त्यागातून, आजचा महाराष्ट्र घडला आहे.



मात्र
, या महाराष्ट्रावर कोरोनाचे महासंकट आहे. या संकटाचा मुकाबला डॉक्टर, परिचारिका, पॅरामेडिकल स्टाफ, पोलीस, होमगार्ड, सफाई कामगार, महापालिका-नगरपालिकांचे कर्मचारी, आशा वर्कर, आरोग्य विभाग, औषध प्रशासन विभाग, अन्य स्थानिक स्वराज संस्थांचे, शासनाच्या अन्य विभागांचे अधिकारी, कर्मचारी रस्त्यावर उतरून जीव धोक्यात घालून करत आहेत. अशा वेळी काहींनी हौतात्म्यही पत्करले आहे. महाराष्ट्राचा इतिहास संघर्षाचा आहे. प्रत्येक वेळी महाराष्ट्राने प्रत्येक संकटांचा यशस्वी मुकाबला केला आहे. कोयना भूकंप, १९७२चा दुष्काळ, किल्लारी भूकंप, २० ० ५ची अतिवृष्टी, महापूरासारख्या संकटांचा महाराष्ट्राने यशस्वी मुकाबला केला. महाराष्ट्र कोरोनावरही लवकर विजय मिळवेल, पण लोक घरी बसले तर. तेच या लढवय्यांसाठी स्फूर्तिगान ठरेल. जय जय महाराष्ट्र!

- अरविंद सुर्वे

@@AUTHORINFO_V1@@