कोरोनाच्या लढ्यात रेल्वेची साथ; ३७ हजार वैद्यकीय कर्मचारी तैनात

    09-Apr-2020
Total Views |
railway _1  H x

 ३ हजार रल्वे डब्ब्यांचे विलगीकरण कक्षात रुपांतर


 
 
मुंबई (प्रतिनिधी) - कोरोनाशी दोन हात करण्यासाठी भारतीय रेल्वेचे वैद्यकीय कर्मचारी सज्ज झाले आहेत. रेल्वे विभागाचे २,५०० डाॅक्टर आणि ३५ हजार वैद्यकीय कर्मचारी कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी तैनात करण्यात आल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली. कोरोना बाधित आणि संशयित रुग्णांवर उपचार करण्यासाठी रेल्वेची रुग्णालये खुली करण्यात आली आहेत.
 
 
 
 
कोरोना बाधितांवर उपचार करण्याचा ताण रुग्णालये आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांवर आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, वैद्यकीय क्षेत्राला मदतीचीही गरज आहे. अशा परिस्थितीत रेल्वे विभाग धावून आला आहे. आज केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या पार पडलेल्या पत्रकार परिषदेत रेल्वे मंत्रालयाकडून सुरू असलेल्या मदतीवर प्रकाश पाडण्यात आला. कोरोना रुग्णांवर उपाचार करण्यासाठी रेल्वेने त्यांची ५८६ हेल्थ युनिट, ४५ सब-डिव्हिजन हाॅस्पिटल, ५६ डिव्हिजनल हाॅस्पिटल, ८ प्रोडक्शन युनिट आणि १६ झोनल हाॅस्पिटल खुली केल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाचे सचिव लव अग्रवाल यांनी दिली. याशिवाय रेल्वेचे एकूण ३७,५०० वैद्यकीय कर्मचारीही मदत करण्यासाठी तैनात असल्याचे ते म्हणाले. पाच हजार रेल्वे गाड्यांच्या डब्ब्यांचे विलगीकरण कक्षात रुपांतर करण्यात आले असून त्यामध्ये ८० हजार खाटांची सुविधा होणार आहे. यामधील ३,२५० डब्बे विलगीकरण कक्ष म्हणून तयार झाले आहेत.