सोशल डिस्टंसिंग पाळण्यात ऑर्किड-गोल्डन ड्रीमचा आदर्श !

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Apr-2020
Total Views |
Orchid_1  H x W




दररोज गरजूंना अन्नदान उपक्रमाची सुरुवात

डोंबिवली : राज्य सरकारतर्फे 'लॉकडाऊन' घोषित केल्यानंतर अनेक ठिकाणी या सूचनांना केराची टोपली दाखवण्याचे काम सुरू आहे. मात्र, डोंबिवलीतील ऑर्किड-गोल्डन ड्रीम येथे राहणाऱ्या रहिवाशांनी इतर सोसायट्यांसमोर एक आदर्श निर्माण केला आहे. सोशल डिस्टंसिंगचे नियम पाळून दररोज ५० गरजूंसाठी जेवण लॉकडाऊनच्या पहिल्या दिवसापासून दिले जात आहे.
 
 
ऑर्किड-गोल्डन ड्रीम कार्यकारणी सदस्यांनी राष्ट्रीय आपत्कालीन परिस्थितीत कर्तव्यावर असलेल्यांना त्यांच्या कुटूंबियांसह मदत करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. गरीब आणि बेघर, कोरोनामुळे हतबल असलेल्या नागरिकांच्या घराजवळ एकवेळचे जेवण उपलब्ध करून दिले जात आहे. यात इथला प्रत्येक रहिवाशी दर दिवशी ५० जणांचे जेवण उपलब्ध करून देतो.
 
 
कार्यकारणीचे केवळ दोन ते तीन स्वयंसेवक सोशल डिस्टंसिंगचे नियम पाळून हे भोजन गरजूंपर्यंत पोहोचवतात. तसेच सर्वांना सोशल डिस्टंसिंग म्हणजे काय त्यांचे महत्व काय? याची माहिती देतात. आमदार राजू पाटील यांच्या सहकार्यातून इमारतीचा संपूर्ण परिसर निर्जंतूकीकरण करून घेण्यात आला आहे. तसेच लॉकडाऊनमुळे सफाई कामगार उपलब्ध नसल्याने सार्वजनिक जागा स्वच्छ करण्याची जबाबदारीही रहिवाशांनी उचलली आहे, अशी माहिती रहिवासी शंकर जगताप यांनी दिली. 
राजेश राठोड, दयानंद राठोड, अमित कंदिकुरवार, श्रीकांत राजे, निखिल तोरणे, गेनू लोखंडे, कुलदीप चव्हाण, 
व संपूर्ण ओर्चिड गोल्डन ड्रीम कार्यकारिणीचे सदस्य यांनी यासाठी विशेष हातभार लावला आहे.
@@AUTHORINFO_V1@@