चीनपुढे आता 'फॉल्स निगेटिव्ह'चे संकट ; भारतावरही सावट

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Apr-2020
Total Views |


falls negative_1 &nb


केवळ चीनच नव्हे आता तर जगभरात 'फॉल्स निगेटिव्ह'चे रुग्ण सापडत आहे. भारतातही या प्रकारचे रुग्ण मिळत असल्याने भारत सरकार समोरील आव्हानांमध्ये भर पडली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानेही याची पुष्टी केली आहे.


चीनच्या वुहान प्रांतातून सुरु झालेल्या कोरोना या संसर्गजन्य आजाराने आता संपूर्ण जगभरात थैमान घातले आहे. तब्बल ७६ दिवसांच्या लॉकडाऊननंतर बुधवारी वुहान शहरातील निर्बंध उठविण्यात आले. परंतु संपूर्ण जग अजूनही कोरोनाच्या सावटाखाली आहे. हे संकट टळते ना टळते तोच पुन्हा नवे संकट उभे ठाकले आहे. ते संकट म्हणजे
'फॉल्स निगेटिव्ह'चे. केवळ चीनच नव्हे आता तर जगभरात 'फॉल्स निगेटिव्ह'चे रुग्ण सापडत आहे. भारतातही या प्रकारचे रुग्ण मिळत असल्याने भारत सरकार समोरील आव्हानांमध्ये भर पडली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानेही याची पुष्टी केली आहे. भारतातही कोरोनाची लक्षणे न आढळणारी परंतु कोरोना पॉझिटिव्ह असणाऱ्या काही केसेस भारतात मिळत आहेत.


'फॉल्स निगेटिव्ह' म्हणजे काय ?

 


भारतात गेल्या काही आठवड्यांत फॉल्स निगेटिव्हचे अनेक रुग्ण आढळले आहेत. फॉल्स निगेटिव्ह म्हणजे ज्या व्यक्तींमध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणे दिसत नाही
; मात्र त्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे चाचणी अहवालातून पुढे आले आहे. जगभरात आतापर्यंत ३० टक्के रुग्ण हे फॉल्स निगेटिव्ह आढळलेले आहे. अशा रुग्णांमुळे कोरोनाचासंसर्ग वेगाने फैलाव होण्याचा धोका जास्त असतो.


चीनमध्ये सद्यस्थिती

 


कोरोना विषाणूमुळे 
'सायलेंट कॅरियर्स'ची उद्भवलेली परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी चीनने बुधवारी नव्या उपाययोजना जाहीर केल्या. याबाबत चीनच्या नॅशनल हेल्थ कमिशनने सांगितले की, चीनमध्ये बुधवारी ६३ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. त्यापैकी ६१ प्रवासी परदेशातून आले होते. आधीच्या कोरोना लाटेने उद्ध्वस्त केलेल्या चीनने आता या नव्याने सुरु झालेल्या दुसऱ्या लाटेवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रत्येक राज्यांना संक्रमण रोखण्यसाठीचे आदेश व नियमावली निर्गमित केले आहे.


काय होऊ शकतो परिणाम ?

 


फॉल्स निगेटिव्ह म्हणजे लक्षणे दिसत नसलेल्या रुग्णांमुळे कोरोनाच्या संसर्गाचा धोका वाढण्याची शक्यता असते. अशा व्यक्ती बाजार
, किराणा दुकानांमध्ये किंवा गर्दीच्या ठिकाणी गेल्यास त्यांच्यापासून कोरोनाचा प्रसार झपाट्याने वाढू शकतो. तसेच तुम्हाला सर्दी, ताप, खोकला किंवा श्वसनासंबंधीचा किंचीतही त्रास जाणवत असेल आणि त्याकडे तुम्ही दुर्लक्ष केल्यास तुम्हालाही मोठ्या संकटाला सामोरे जावे लागेल, असा इशारा कोलंबिया विद्यापीठाच्या आरोग्य विभागातील प्राध्यापक जेफेरी शमान यांनी दिला आहे.

@@AUTHORINFO_V1@@