कोरोनाचा केंद्रबिंदू वुहान पूर्वपदावर, ७६ दिवसांनी लॉकडाउन उठवला

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Apr-2020
Total Views |

china lockdown_1 &nb
वुहान : कोरोनाचे केंद्रबिंदू राहिलेल्या चीनमधील वुहान शहरातील लॉकडाउन ७६ दिवसांनी हटवण्यात आला आहे. बुधवारी मध्यरात्रीनंतर शहरातील नागरिक लॉकडाउनमधून स्वतंत्र होणार आहेत. कोरोनाचा फैलाव वाढू लागल्यानंतर २३ जानेवारीला शहरात लॉकडाउन जाहीर करण्यात आला होता. यानंतर शहरातील एक कोटी नागरिक घरात कैद झाले होते.


वुहान करोनाचे केंद्र ठरले. शहरात ३३०० हून जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. ८२ हजाराहून जास्त लोकांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचे आढळले. नुकत्याच समोर आलेल्या सरकारी आकडेवारीनुसार, गेल्या काही आठवड्यात कोरोनाच्या केसेसमध्ये घसरण पहायला मिळाली आहे. मंगळवारी जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, शहरात करोनाचा एकही रुग्ण मिळालेला नाही. ७६ दिवसांच्या लॉकडाउनमध्ये लोकांच्या घराबाहेर पडण्यावर पूर्णपणे बंदी आणण्यात आली होती. फक्त जीवनाश्यक वस्तू घेण्यासाठी घराबाहेर पडण्याची लोकांना परवानगी होती. शहराच्या सीमारेषाही बंद करण्यात आल्या होत्या.
@@AUTHORINFO_V1@@