खासगी लॅबमध्ये कोरोनाची तपासणी मोफत व्हावी

    08-Apr-2020
Total Views |

test_1  H x W:


वैद्यकीय कर्मचाऱ्यांची सुरक्षा अत्यंत महत्त्वाचे असून हे सर्वजण योद्धा आहेत. : सर्वोच्च न्यायालय
 



नवी दिल्ली
: कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला काही महत्वपूर्ण सूचना केल्या आहेत. यातील खासगी लॅबमध्ये होत असणाऱ्या चाचण्यांच्या संदर्भात देखील काही सूचना केल्या आहेत. खासगी लॅबमध्ये तपासणीची प्रक्रिया काय असावी याबाबत निश्चित असे धोरणही ठरवावे असेही सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे.कोरोना तपासणी आणि प्रसाराला पायबंद घालण्यासाठी प्रयत्नशील असणारे डॉक्टर्स, नर्सेस आणि वैद्यकीय कर्मचारी यांच्या सुरक्षेबाबत सुप्रीम कोर्टात आज सुनावणी पार पडली.


याचबरोबर तर खासगी लॅबमध्ये देखील कोरोना विषाणूची तपासणी मोफतच करण्यात यावी असेही सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे. देशभरात करोनाचा उद्रेक झालेला असताना वैद्यकीय कर्मचाऱ्यांची सुरक्षा अत्यंत महत्त्वाचे असून हे सर्वजण योद्धा आहेत. त्यांच्या कुटुंबीायंची सुरक्षाही महत्त्वाची आहे, असे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे. रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या तबलीघी जमातीच्या काही रुग्णांनी डॉक्टर्स, नर्स आणि इतर वैद्यकीय कर्मचाऱ्यांशी अयोग्य वर्तन केले. त्या पार्श्वभूमीवर सुप्रीम कोर्टाचे हे वक्तव्य महत्त्वाचे मानले जात आहे.

कोरोनाशी सामना करण्यासाठी केंद्र सरकार महत्त्वपूर्ण पावले उचलत आहे, असे सरकारच्या वतीने सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी कोर्टाला सांगितले. पीपीई किट जलद बनविण्यात येत असल्याची माहितीही त्यांनी दिली. याशिवाय करोना लागण झालेल्या लोकांपासून इतरांना करोनाची लागण होणार नाही, याची काळजी घेतली जात आहे. केंद्र सरकारने सर्व राज्य सरकार आणि खासगी डॉक्टरांच्या पगारामधून कोणत्याही प्रकारची कपात करू नये असे सांगितले आहे, असेही ते म्हणाले.