'आम्हाला अत्यंत अमानवीय वागणूक'...पाकमधील डॉक्टरांची व्यथा

    07-Apr-2020
Total Views | 196


pakisatn PPE_1  


इस्लामाबाद : पाकिस्तानात पर्सनल प्रोटेक्शन इक्वीपमेंट न मिळाल्याने आंदोलन करणाऱ्या पाकिस्तानी डॉक्टर, वैद्यकीय कर्मचाऱ्यांवर लाठीचार्ज करण्यात आला. पोलिसांकडून मारहाण झाल्यामुळे संतप्त झालेल्या डॉक्टर संघटनांनी उपचार थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. डॉक्टरांच्या या बहिष्कारामुळे पाकिस्तानमधील कोरोनाविरुध्दच्या लढ्यावर परिणाम पडण्याची शक्यता आहे.



कोरोनाचा शिरकाव झालेल्या पाकिस्तानची अवस्था तर खूपच बिकट झाली आहे. देशाची आर्थिक स्थिती लक्षात घेता लॉकडाऊन करणं शक्य नाही
, असा निर्णय पाकच्या पंतप्रधानांनी घेतला. त्यानंतर आता पाकिस्तानमधील डॉक्टरांच्या एका संघटनेने बहिष्कार टाकत सेवाच बंद केली आहे.


बलुचीस्तान प्रांतात १९५ कोरोना रुग्ण सापडले आहेत. बलुचीस्तान पाकिस्तानमधील अंत्यत मागास प्रांतापैकी एक प्रांत आहे. कोरोना बाधितांवर उपचार करणाऱ्या डॉक्टर
, नर्सेस, इतर वैद्यकीय कर्मचाऱ्यांना संरक्षण पोषाख उपलब्ध करण्यात आलेला नाही. पीपीईच्या अभावी कोरोना रुग्णांवर उपचार करणारे क्वेटा इथल्या शासकीय रुग्णालयातील १३ डॉक्टरांना कोरोनाचा संसर्ग झाला. त्यामुळे यंग डॉक्टर्स असोसिएशनने आरोग्य मंत्रालयासमोर आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी आंदोलनकर्त्या डॉक्टरांवर लाठीचार्ज केला. त्यांना अटक केली. रेड झोनचे उल्लंघन करणाऱ्या डॉक्टरांना अटक केल्याची पुष्टी पोलिसांनी दिली आहे.



या लाठीचार्चमुळे संतप्त डॉक्टर संघटनेने रुग्णालयातील कामावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. 
'आम्हाला अत्यंत अमानवीय वागणूक दिल्याचा आरोप' या डॉक्टरांनी केला आहे. पाकिस्तानमध्ये कोरोना बाधितांची संख्या साडेतीन हजारावर गेली आहे. ५२ जणांचा मृत्यु झाला आहे . यामध्ये सर्वाधिक पंजाब प्रांतात १८१६ तर त्या खालोखात सिंध प्रांतात ९३२ कोरोना बाधित रुग्ण सापडले आहेत. तर बलुचिस्तानमध्ये ही संख्या १९५ वर गेली आहे.

अग्रलेख
जरुर वाचा
मरीआई म्हसोबांच्या भक्तिपंथी रक्षणकर्ते ; कुंचीकोरवे कैकाडींचा अस्मितेचा जागर

मरीआई म्हसोबांच्या भक्तिपंथी रक्षणकर्ते ; कुंचीकोरवे कैकाडींचा अस्मितेचा जागर

कुंचीकोरवे कैकाडी समाजाची ‘आखाडी जत्रा’ ही केवळ धार्मिक परंपरा नसून, समाजाच्या अस्मितेचा, श्रद्धेचा आणि सांस्कृतिक सातत्याचा जिवंत पुरावा आहे. संत कैकाडी महाराज यांची शिकवण, छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्यातील योगदानाची परंपरा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची प्रेरणा घेऊन हा समाज सुसंस्कृत, जागरूक आणि समर्पित वाटचाल करीत आहे. हा विशेष लेख या परंपरेचा आणि समाजाच्या सांस्कृतिक-सामाजिक प्रवासाचा साक्षीदार ठरत, त्या अखंड परंपरेच्या गौरवाचा दस्तऐवज ठरावा, हाच उद्देश...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121