साताऱ्यात कोरोनाचा पहिला बळी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Apr-2020
Total Views |

satara_1  H x W


कॅलिफोर्नियावरुन आलेल्या रुग्णाचा मृत्यू


सातारा : साताऱ्यात कोरोनाचा पहिला बळी गेला आहे. कॅलिफोर्नियावरुन आलेल्या ६३ वर्षीय पुरुषाचा सोमवारी पहाटे मृत्यू झाला. त्यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांच्या मृत्यूंची संख्या ४६ वर पोहोचला आहे. तर राज्यातील ७४८ जण कोरोनाबाधित आहे.


साताऱ्यात आज मृत्यू झालेल्या रुग्णाला १४ दिवसांपूर्वी शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. काल फेर तपासणीत या रुग्णाचे निगेटिव्ह आले होते. मात्र आज पहाटे या रुग्णाचा मृत्यू झाला. हा रुग्ण साताऱ्यातील पहिला कोरोना बळी ठरला. जिल्हाधिकारी शेखर सिंग यांनी याबाबतची माहिती दिली.


मुंबई शहरात रविवारी १०३ नवीन ‘कोरोना’ग्रस्त रुग्णांची नोंद झाली. ही एका दिवसातील सर्वाधिक वाढ आहे. २ एप्रिलपर्यंत शहरामध्ये २३८ रुग्ण होते, तेव्हा रुग्णालयातील ३१० खासगी बेडपैकी सुमारे ४२% जागा भरल्या होत्या.


राज्यात कालच्या दिवसात ११३ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. यामुळे राज्यातील रुग्ण संख्या ७४८ झाली आहे तर आतापर्यंत ५६ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. मुंबईतील ‘कोरोना’ग्रस्तांचा आकडा ४५८ वर पोहोचला आहे.
@@AUTHORINFO_V1@@