आरोग्य सेवक, पोलिसांसाठी ‘फेस प्रोटेक्शन कव्हर’ची निर्मिती

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Apr-2020
Total Views |
 
pune_1  H x W:
 
 
पुणे : कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पाबळ येथील ‘डिझाईन इनोवेशन सेंटर’ने अशा संसर्गापासून चेहऱ्याला संरक्षण देण्यासाठी ‘फेस प्रोटेक्शन कव्हर’चे डिझाईन निवडले आहे. त्यानुसार त्याचे उत्पादनही सुरू करण्यात आले असून, ती आरोग्य केंद्रांवरील सेवक व पोलिसांच्या वापरासाठी ती पाठविण्यातही आली आहेत.
 
 
या फेस प्रोटेक्शन कव्हरचा उपयोग आरोग्य केंद्रांमधील डॉक्टर, परिचारिका, कोरोना संबंधित विविध प्रयोगशाळांमधील आरोग्य सेवक आणि पोलिसांना होणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, ही निर्मिती सुरू करण्यात आली आहे. उपलब्ध असलेले सर्वोत्तम ओपन सोअर्स डिझाईन वापरण्यात आले. ते वापरून नव्याने प्रायोगिक तत्वावर निर्मिती करण्यात आली. हे मास्क आता विविध आरोग्य केंद्रांना वितरित करण्याचे काम सुरू लकरण्यात आले आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी पुरवण्यात आली आहेत.
 
 
मोठ्या संख्येने मास्क तयार करण्यासाठी कच्च्या मालाची आवश्यकता होती. तो मिळवण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. सध्या आणखी ३५०० कव्हर तयार करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. गरजेनुसार त्यात वाढही करण्यात येईल, अशी माहिती डिझाईन इनोवेशन सेंटरचे डॉ. अरविंद शाळिग्राम व पाबळ येथील केंद्राचे संचालक डॉ. योगेश कुलकर्णी यांनी दिली.
 
 
@@AUTHORINFO_V1@@