मुंबई : कोरोनाचा सामना करण्यासाठी देशभरातून मदतनिधीसाठी पुढे येत आहेत. राजकारणी, समाजसेवक, क्रीडापटू तसेच अनेक स्तरांमधून मदतीचा हात दिला जात आहे. कोरोनाच्या वैश्विक संकटाचा मुकाबला करण्यासाठी आपले वैयक्तिक योगदान म्हणून संपूर्ण वर्षभर ३० टक्के वेतन पंतप्रधान निधीला (पीएम केअर्स फंड) देण्याची घोषणा राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केली आहे.
मार्च महिन्याचे वेतन पंतप्रधान निधीला देत असल्याचे राज्यपालांनी यापूर्वीच जाहीर केले आहे. कोरोनाच्या महामारीला प्रतिबंध करण्यासाठी सर्वस्तरातून राज्याकडे, तसेच केंद्राकडे मदतीचा ओघ सुरू आहे. राज्यपाल कोश्यारी यांनीही आपली वैयक्तिक मदत केंद्राकडे देण्याचे जाहीर केले.