कोरोना कहर भाग ३

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Apr-2020
Total Views |


corona arogya_1 &nbs


आजाराचा योग्यवेळी प्रतिबंध करणे हे आजार बरे करण्यापेक्षाही जास्त महत्त्वाचे असते. (Prevention is better than Cure) असे नेहमी म्हटले जाते. कोरोना व्हायरसच्या प्रतिबंधासाठी काही गोष्टींची खबरदारी घेणे महत्त्वाचे असते.


) श्वसन संस्थेचा आजार असलेल्या व्यक्तींशी निकट सहवास टाळणे. श्वसन संस्थेशी निगडित काही आजार किंवा लक्षणे दिसल्यास जसे क्षयरोगाच्या रुग्णाबाबत आपण काळजी घेतो, त्याचप्रकारची काळजी घ्यावी. रुग्णाचे रुमाल, कपडे हे जंतुनाशकाने स्वच्छ धुवावेत.

 

) हा आजार हवेतून पसरत असल्याने व या विषाणूचा संपर्क हाताशी जास्त होण्याची शक्यता असल्याने हातांची नियमित स्वच्छता राखावी. साबणाने किंवा हॅण्डवॉशने हात स्वच्छ धुवावेत.

 

) कोरोना विषाणू हा प्राणिजन्य असल्यामुळे न शिजवलेले अथवा अपुरे शिजवलेले मांस खाऊ नये.

 

) फळे तसेच भाज्या न धुता खाऊ नये.

 

) खोकताना, शिंकताना, नाका-तोंडावर रुमालाचा किंवा टिश्यू पेपरचा वापर करावा. अशाप्रकारे वापरलेले टिश्यू पेपर ताबडतोब व्यवस्थित झाकण असलेल्या कचरा पेटीत टाकावेत.

 

) एखादा रुग्ण खोकत असेल किंवा सतत शिंकत असेल, तर अशा रुग्णापासून साधारपणे तीन फुटांचे तरी अंतर ठेवून असावे.

 

) शक्यतो, गरज नसल्यास गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, अशाने आजार पसरण्याचा धोका कमी असतो.

 

) इतर लोकांशी भेटत असताना सहसा हस्तांदोलन टाळावे, तर हात जोडून नमस्ते करावे.

 

) स्वतःच्या डोळ्यांना, नाकाला व तोंडाला सतत स्पर्श करू नये.

 

१०) सार्वजनिक ठिकाणी कधीही थुंकू नये. कारण, आजाराचे विषाणू 'Droplets' मधून पसरत असतात.

 

११) उगीचच चेहऱ्यावर मास्क लावू नये, ज्यांना आजाराची लक्षणे दिसत आहेत, अशांनीच मास्क वापरावा.

 

१२) आजारापासून किंवा विषाणू संसर्गापासून वाचण्यासाठी स्वतःवर औषधांचे प्रयोग स्वतःच करून बघू नयेत. या विषाणूवर कुठलीही प्रतिजैविके (Antibiotics) काम करता नाहीत. त्यामुळे अशा प्रकारची कुठलीही औषधे घेऊ नयेत.

 

१३) गरज नसल्यास शक्यतो प्रवास टाळावा.

 

खालील व्यक्तींनी विनाविलंब वैद्यकीय सल्ला घ्यावा.

 

) श्वसनाचा त्रास होणाऱ्या व्यक्ती.

 

) हा श्वसनाचा त्रास कोणत्या आजारामुळे आहे किंवा कोणत्या विषाणू अथवा जीवाणूमुळे आहे, हे जर स्पष्ट होत नसेल तर व रुग्णाने नुकताच मध्यपूर्वेतील देशांमध्ये प्रवास केला असेल तर.

 

) ज्या रुग्णांची रोगप्रतिकारकशक्ती कमी आहे, अशा आधीपासूनच आजारी व्यक्ती आणि ज्या व्यक्तींनी नुकताच नवीन कोरोना विषाणूबाधित देशात प्रवास केला आहे, असा व्यक्तींनी त्वरित वैद्यकीय सल्ला घ्यावा व उचित अशा तपासण्या करून घ्याव्या.

 

पुढील भागात याच संदर्भात व उपचारांबाबत माहिती पाहूया. (क्रमश:)

 

- डॉ. मंदार पाटकर

(लेखक एमडी होमियोपॅथी आहेत.)

 
 
@@AUTHORINFO_V1@@