आयुर्वेद नेऊ घरोघरी...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Apr-2020
Total Views |


vicco termeric_1 &nb

 
 


आम्ही माध्यम आहोत, केवळ 'आयुर्वेद नेऊ घरोघरी' हेच आमचे ब्रीद आहे़ लोकांच्या गरजा आणि त्यांचे हित लक्षात घेऊनच आम्ही आमच्या उत्पादनांवर भर दिला आहे. लक्ष्मी चंचल असते, त्यामुळे अफाट नफा मिळवून ती टिकेलच असे नाही. त्यामुळे सचोटीने काम करत राहिल्यास कशाचीही कमतरता भासत नाही.


काळ कसा झटपट निसटून जातो. माझी आरोग्यविषयक सफर आणि 'विको'ची सफर अगदी हातात हात घालून सुरु आहे. जुन्या गोष्टींना उजाळा मिळत आहे. पुन:प्रत्ययाचा आनंद काही औरच असतो़ स्मृतींना उजाळा मिळावा आणि गप्पा मारण्यासाठी दर्दी असतील तर 'गप्पांचा फड' जमून येतो. ज्या प्रेरणेने प्रेरित होऊन माझ्या आजोबांनी 'विको'ची स्थापना केली, त्याला आता बघता बघता ६८ वर्षे लोटली आहेत. एका सूक्ष्म बीजाचे वटवृक्षात रुपांतर झाले आहे. हे वैभव पाहायला माझे आजोबा, माझे वडील, माझा काका हयात नाहीत. त्यांच्या अपार मेहनतीचे फळ म्हणून हे वैभवाचे दिवस आले. घरातील स्त्रियांचा पाठिंबा ही त्याहून मोलाची गोष्ट असते, कोणत्याही यज्ञामागे! आयुर्वेदाची, निसर्गाची कास आम्ही धरुन ठेवली आणि याच आयुर्वेदाने आम्हाला 'सोन्याचे दिवस' दाखवले. माझ्या अखंड चिंतनात समाजहिताचा विचार असतो. कारण, समाजावर त्याच्या स्वास्थ्यावर आपले वैयक्तिक आणि कौटुंबिक जीवन अवलंबून असते. खरंच 'आरोग्य' हा कोणत्याही व्यक्तीचा, कुटुंबाचा, समाजाचा, राष्ट्राचा महत्त्वपूर्ण जिव्हाळ्याचा विषय आहे. कारण, यावर इतर अनेक गोष्टी अवलंबून आहेत. आरोग्यपूर्ण जीवन किती महत्त्वाचे आहे, हे हॉस्पिटलमध्ये भरती झाल्यावर आपल्याला कळते. हॉस्पिटलमधील वास्तव्य हे कोणत्याही व्यक्तीचे, कुटुंबाचे मानसिक, शारीरिक, आर्थिक खच्चीकरण करते. आपण सर्वांनी असा अनुभव कधी ना कधी घेतला असेलच! असे प्रसंग अगदी आपल्या हाडवैर्‍यावरही येऊ नयेत़. मला नेहमीच वाटते वैयक्तिक स्वास्थ्य पुरेशी झोप, नियमित व्यायाम, योग्य पौष्टिक आणि संतुलित आहार आणि तणावविरहित मुक्त जीवन याने चांगले राहू शकते. आपली कार्यक्षमता ही आपल्या आरोग्यावर अवलंबून आहे. या शरीरसंपदेची आपण सर्वांनी योग्य ती काळजी घ्यावी आणि ईश्वरीय नितांत सुंदर देणगीचा आस्वाद घ्यावा.

 

आपल्या स्वयंपाकघरापासून आरोग्याची काळजी घ्यायला हवी. 'उदर भरणम्' योग्य नसेल तर पोटाच्या आणि तद्नुषंगाने इतर अनेक समस्या उद्भवतात आणि ही पोटदुखी नंतर 'डोकेदुखी' ठरते. आपल्या अनेक समस्या वैयक्तिक अस्वच्छता, सामाजिक अस्वच्छता यातून जन्माला येतात. पाश्चिमात्त्य देशात त्यांची सामाजिक स्वच्छता वाखाणण्याजोगी आहे. आपणही त्यांच्या या गोष्टीचे अनुसरण करायला हवे. आपण परमेश्वराची लाडकी लेकरे आहोत. निसर्गाने आपल्यावर मुक्तपणे भरभरून दिले आहे. त्याचा योग्य उपयोग केल्यास आपले जीवन नक्कीच आरोग्यपूर्ण आणि समस्या विरहित असे असेल. मला आपल्या पुरातन समाजव्यवस्थेचे नेहमीच आकर्षण वाटते़ बारा बलुतेदार पद्धती, शेतीप्रधान अर्थव्यवस्था सगळे घटक एकमेकांशी संलग्न अशी संपूर्ण देशात लागू होती आणि सगळे कसे गुण्यागोविंदाने नांदत होते. ऐतिहासिक चित्रपट, मालिका यामुळे पूर्वीच्या परंपरा समजतात. स्त्री-पुरुष पेहरावही समजतो़ पूर्वी दाढी-मिशा राखण्याकडे कल होता. विशिष्ट धर्मात केस कापले जात नाहीत. ऐतिहासिक प्रसिद्ध व्यक्तींच्या फोटोंमध्ये दाढी-मिशा आढळतात. हल्लीच्या तरुणाईत दाढी वाढवण्याची फॅशन आली आहे. आमच्यावेळी 'क्लिन शेव्ह'वर भर असायचा. 'कालाय तस्मै नम:।' बारा बलुतेदारांमध्ये 'नाभिक' अर्थात 'न्हावी' हा गावातील महत्त्वाचा घटक असे. संपूर्ण गावातील पुरुष मंडळींचे केस कापणे आणि दाढी करणे ही त्यांची मुख्य कामं असत़ परंतु, इंग्रज आले आणि संपूर्ण देशात बदल घडून आले. ब्रिटिशांनी बारा बलुतेदार पद्धतीला सुरुंग लावला आणि एकमेकांशी संलग्न घटक सुटे झाले. सुंदर मोत्यांची माळ तुटावी आणि एक एक मोती विखुरला जावा, तसं हे समाजधन विखुरलं गेलं. नाभिकाकडून केस कापून घेणं आणि दाढी करणं या गोष्टी दुर्मीळ झाल्या. केस कापण्यासाठी न्हाव्यांची दुकानं आणि घरातल्या घरात पुरुष मंडळींनी दाढी करायला सुरुवात केली आणि एका सुंदर नात्याला, खेळीमेळीच्या वातावरणाला सुरुंग लागला. गप्पांचा फड बंद झाला. स्त्री-पुरुष शरीर रचना भिन्न आहे. निसर्गाने प्रत्येकाची जडणघडण केली आहे. पौगंडावस्थेत मुलांना दाढी, मिशा यायला सुरुवात होते. तारुण्यात प्रवेश करण्याची सुरुवात आता झालेली असते.

 

आयुर्वेदिक उत्पादनांची परंपरा 'विको'ने सुरू ठेवली. त्यात ग्राहकांच्या 'आरोग्या'सोबत सौंदर्याचाही विचार केला. 'सौंदर्य उत्पादनां'पेक्षा 'आरोग्य उत्पादने' अशी आमची ओळख. दैनंदिन कामातील 'शेव्हिंग' हा समस्त पुरुषवर्गाचा कार्यक्रम़ दररोज पार्लर किंवा दुकानात जाऊन दाढी करणे शक्य नाही. त्यासाठी घरच्याघरी दाढीचा साबण आणि रेझरच्या साहाय्याने दाढी उरकली जात असे. यात सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला. ब्लेडने कट येणे वगैरे प्रकार सर्रास घडत होते. चेहर्‍याच्या त्वचेचा पोत सुधारणे महत्त्वाचे होते. स्त्री असो वा पुरुष, चेहरा हा तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा महत्त्वाचा भाग. त्यामुळे आपण सुंदर दिसावे असे स्त्रियांना वाटते तसे पुरुषवर्गालाही वाटत असते. केवळ दाढीचा साबण पुरुषांचे सौंदर्य अबाधित राखू शकत नाही. यासाठी आम्ही पुरुषवर्गासाठी 'विको टर्मरिक शेव्हिंग क्रिम विथ फोम बेस' हे उत्पादन आणले आणि समस्त पुरुषवर्गाने या उत्पादनाला अक्षरश: डोक्यावर घेतले. हे फक्त शेव्हिंग क्रिम नव्हते, त्यात आयुर्वेदिक घटकांचा योग्य आणि पुरेपूर वापर केला होता. 'हळद' ही जंतुघ्न आहे. तिचे औषधी गुणधर्म तुमच्या चेहर्याच्या त्वचेची १०० टक्के सुरक्षिततेची हमी देणाऱ चंदन तेल तुमच्या चेहर्‍याला आवश्यक ते सर्व देणार. ग्राहकांनी अनेक उत्पादने वापरली, परंतु 'विको टर्मरिक शेव्हिंग क्रिम विथ फोम बेस'ने पुरुषमनावर ताबा मिळवला आहे. रेझरमुळे येणारा राठपणा, कट्स आता येणार नाहीत. त्वचा निस्तेज दिसत नाही. प्रसन्न दिवसाची प्रसन्न सुरुवात शेव्हिंग क्रिम करते. त्याच्या सुगंधाने तनामनाला उभारी येते. प्रसन्नतेचा शिडकावा करत, खुललेल्या मनाने आणि तुकतुकलेल्या कांतीने तरुणाई आपल्या स्वप्नांची क्षितिजं बीज करायला सज्ज होतात. हा आत्मविश्वास केवळ एक शेव्हिंग क्रिम देऊ शकते, ही खरंतर अतर्क्य वाटणारी गोष्ट आहे. पण, हा सुंदर अनुभव अनेकजण घेतात. त्या सुगंधात आणि सुरक्षिततेत न्हाऊन निघतात.

 

आम्ही माध्यम आहोत, केवळ 'आयुर्वेद नेऊ घरोघरी' हेच आमचे ब्रीद आहे़ लोकांच्या गरजा आणि त्यांचे हित लक्षात घेऊनच आम्ही आमच्या उत्पादनांवर भर दिला आहे. लक्ष्मी चंचल असते, त्यामुळे अफाट नफा मिळवून ती टिकेलच असे नाही. त्यामुळे सचोटीने काम करत राहिल्यास कशाचीही कमतरता भासत नाही. आमचे कोणतेही उत्पादन हे ग्राहकहिताचा विचार करणारे आहे. त्यात त्याच्या खिशाला कात्री लागता कामा नये़ त्यामुळे केवळ आकर्षक पॅकिंगवर भर देण्यापेक्षा उत्पादनाच्या उपयोगितेकडे आम्ही नेहमीच लक्ष केंद्रित केले आहे. एकदा आणलेले उत्पादन काटकसरीने वापरले तर बरेच दिवस पुरते, हा सर्व ग्राहकांचा अनुभव आहे़ मध्यमवर्गीय मराठमोळं जीवन, एकत्र कुटुंबपद्धती त्यावेळची गरिबी माझ्या आजोबांनी, आमच्या दादांनी (कै. गजाननराव पेंढरकर) अनुभवली आहे. उद्योजक घराणं नावारुपाला येण्याआधी या पिढीने खूप सोसले आहे. समाजॠण मान्य करुन समाजाला भरभरुन देण्याचा वारसा मला माझे आजोबा कै. दादा आणि सर्व काकांकडून मिळाला. माझा पिंड अध्यात्माकडे झुकणारा आहे़ आज वैभवात असूनही मी मनाने निर्लेप आहे. मला कोणतेही व्यसन नाही़ माझं वर्तन आणि चारित्र्य शुद्ध आहे, हे मी अभिमानाने सांगतो. माझ्यावरील संस्कार आणि मी घरात मोठा असल्याने माझ्यावर जबाबदार्‍या पडल्या़ शिक्षणामुळे वैचारिक बैठक निर्माण झाली. ईश्वरी अनुसंधान आणि पूर्वपुण्य गाठीशी असल्याने मी अत्यंत सुखी आहे. सुविद्य, सालस पत्नी, दोन मुलं आणि सून हा माझा प्रपंच केवळ तेवढ्यापुरता मर्यादित नाही तर संपूर्ण 'विको परिवार' माझा आहे़ . 'वसुधैव कुटुंबकम्' किंवा 'हे विश्वचि माझे घर' या उक्तीप्रमाणे माझे आचारविचार अबाधित ठेवले आहे़ आयुर्वेदिक उत्पादनांच्या सान्निध्यात राहून माझेही मन अंर्तबाह्य उजळून निघाले आहे़ काया वाचा मनाने पाप होऊ नये म्हणून मी स्वत:ला जपत असतो. इतरांना मदत करावी, त्यांचे आयुष्य मार्गी लागावे यासाठी माझी तळमळ असते. जुन्या रुढी, परंपरा, रितीरिवाज यांचा मी नेहमीच आदर करतो आणि नवनवीन आधुनिक तंत्रज्ञान मानव हितासाठी कसे वापरता येईल, याचा विचार करतो़ आयुर्वेदाची परंपरा आम्हाला जतन करायची आहे़ तुमचा सहभाग मोलाचा आहे़ कारण, ही एक चळवळ आहे, तुमच्या आमच्या भल्यासाठी!

 
 

- संजीव पेंढरकर

 
 
@@AUTHORINFO_V1@@