आत्मसंयमाचे आचरण

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Apr-2020
Total Views |
File-Pic_1  H x





आपल्या आत्मसंयमाच्या वैशिष्ट्यपूर्ण नमुन्यात एका बाजूला देव असतात आणि दुसर्‍या बाजूला दानव असतो आणि त्याची भीषण लढाई सतत चालू असते. आपल्या सर्वांना मात्र असं वाटतं की, ज्याची इच्छाशक्ती प्रबळ आहे, त्या व्यक्ती ही लढाई उत्तम लढतात. खरेतर ज्यांचा संयम निखालस आहे, त्या व्यक्ती अशा पद्धतीचे युद्ध करतच नाहीत. त्यात ते शिरतच नाहीत.

 


जितका दृढनिश्चय महत्त्वाचा
, तितकाच संयमही आपल्या आयुष्यात महत्त्वाचा आहे. संयमाचे महत्त्व आपल्याला जाणवते, त्यापेक्षाही खूप अधिक आहे. आपल्याला आत्मसंयम सहजासहजी करायला जमत नाही. तसे पाहिले तर संयमाचे कौशल्य आपल्या सगळ्यांकडे आहे. पण, त्याला आपण फार महत्त्व देत नाही, हे सत्यवचन आहे. जेव्हा आपला लोभ आपल्या इच्छाशक्तीवर मात करतो, तेव्हा ते नैतिक पतन असते, ज्याला आपण कठोर शिक्षा करायलाच हवी. प्रलोभनावर मात करण्यास मनुष्य प्राण्याला खूप कठीण वाटते. सहा महिन्यांवर परीक्षा असते म्हणून दोस्त मंडळींमध्ये न जाता अभ्यास करण्यासाठी संयम लागतो. पण, परीक्षा उद्यावर आली तरी 'उद्यापासून नक्की अभ्यास सुरू करतो' या पालुपदातून आपण सुटत नाही. आतापासून मधुमेह नियंत्रणात आणणारच, या भीष्मप्रतिज्ञेसमोर मिठाईचा बॉक्सच श्रेष्ठ ठरतो. 'उद्यापासून दारू सोडली' असे म्हणत किती काळ, किती वर्षे जातात आणि यकृताचा आजार होतो, तरी आपल्या वचनाशी आपण प्रामाणिक राहत नाही.
 

आपल्या आत्मसंयमाच्या वैशिष्ट्यपूर्ण नमुन्यात एका बाजूला देव असतात आणि दुसर्‍या बाजूला दानव असतो आणि त्याची भीषण लढाई सतत चालू असते. आपल्या सर्वांना मात्र असं वाटतं की, ज्याची इच्छाशक्ती प्रबळ आहे, त्या व्यक्ती ही लढाई उत्तम लढतात. खरेतर ज्यांचा संयम निखालस आहे, त्या व्यक्ती अशा पद्धतीचे युद्ध करतच नाहीत. त्यात ते शिरतच नाहीत. पण, आपल्या आयुष्यात ज्या अनेक वैचारिक गोष्टींचा तुटवडा आपल्याला जाणवतो, त्यात 'आत्मसंयम' ही पहिल्या रांगेत जाऊन बसणारी गोष्ट आहे.

 

आपले शास्त्रज्ञ संयमाचा स्रोत आपल्या आयुष्यात आनंदी आणि समाधानी आयुष्य घालवण्यासाठी कसा आणि किती मोलाचा आहे, हे जाणून घेण्यासाठी संशोधन करीत आहेत. किंबहुना, आत्मसंयमाचा स्रोत मर्यादित तर आहेच. पण, तो लवकर खपलाही जातो. एकंदरीत त्याचा साठाच आपल्याकडे उरत नाही. आपल्या स्वभावात बदल घडवायचा म्हटले, तर आपल्या व्यसनाला आळा घालावयाचे म्हटले, तर आपल्या खर्चावर बंधन आणायचे म्हटले, तर संयम पाळण्यापेक्षा आपण तो गमावण्यातच यशस्वी होतो. पण, आत्मसंयमाचे मूल्य बहुमोल आहे. 'आत्मसंयम' हा केवळ शैक्षणिक वा व्यावसायिक कारकिर्दीपुरता आवश्यक नाही. यशसिद्धीपुरता मर्यादित नाही, तर तो आपल्या दैनंदिन जगण्यासाठी महत्त्वाचा आहे. संशोधनात असे आढळले आहे की, ज्यांना ज्यांना आत्मसंयम करता आले, त्यांना समृद्ध आणि समाधानी आयुष्य सहज जगता आले. ज्यांना लहानपणी आत्मसंयमाचे बाळकडू मिळाले, त्यांना पुढील आयुष्यात शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक भरभराट करता आली. ते इतरांपेक्षा उच्च पातळीवरचे प्रसन्न आणि भरगच्च असे सचेतन जीवन जगायला शिकले.

 

आपण आज 'सोशल डिस्टन्सिंग' पाळतो आहोत. किंबहुना, ते पाळण्याव्यतिरिक्त आपल्याकडे उत्तम असा दुसरा पर्याय नाही. जगण्यासाठीची धडपड म्हणजे कमीत कमी सहा फुटांची दरी आज दोन माणसांनी पाळायचीच आहे. उगाचच सहजचा फेरफटका नाही करता येते. आता समोरासमोर राहून गप्पाटप्पा करता येत नाहीत. घरात राहून एकमेकांना सहन करायचं आपल्या हातात आज बाकी आहे. मॉलमध्ये फेरफटका, विरंगुळा म्हणून सिनेमागृह, जीभेची भूक भागवण्यासाठी हॉटेलिंग, खिडकीतून शॉपिंग(विण्डो शॉपिंग) सगळा उघड्या जगातला 'टाईमपास' बंद. काय करणार 'नोव्हेल कोरोना'चा सिझन महागात पडला. सगळ्या जगाला गरीब-श्रीमंतांना, गोर्‍या-काळ्यांना पाश्चात्यांना आणि पौर्वात्यांना कुणालाच आज कोरोनाचे 'कन्सेशन' नाही. पहा 'सर सलामत तर पगडी पचास' इतके काही मनाला लावून घ्यायची गरज नाही. एकटेपणा काही जीवावर बनलेला नाही, उलट आपला जीव वाचणार आहे.

 

आपल्याला जर आयुष्य कंटाळवाणे आणि नीरस वाटत असेल, तर काहीतरी वैचारिक हालचाल करायला पाहिजे. फक्त आपल्याकडे पाहून जगाचे भ्रमण चालले आहे, असा संकुचित विचार झटकून थोडे जागृत होऊन जगाच्या विस्तृत रेखाटनांकडे पाहायला शिकायला लागणार आहे. आपण एकटे असे सामाजिक अंतर ठेवून जगत नाही आहोत. आपण सगळे या विश्वाचा, या देशाचा एक भाग आहोत. आपण एकटे नक्कीच नाहीत. कोरोना गेला की पुन्हा एकदा आपल्याला समाजात मिळून मिसळून राहायचे आहेच. तेव्हा आपला एकांत कसा आनंदाचा होतो, हे पाहायला शिका. डोके जरा खाजवा. बरेच काही सुचेल. पण, आत्मसंयमाचे बंधन स्वतःलाघालणे, ही मानवी यशाची पहिली पायरी आहे, याची जाणीव प्रत्येकाने ठेवली पाहिजे.
 
 - डॉ. शुभांगी पारकर 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@