धक्कादायक! न्यूयाॅर्क प्राणिसंग्रहालयातील वाघ कोरोना पाॅझिटिव्ह

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Apr-2020
Total Views |

tiger_1  H x W:

 

प्राणिसंग्रहालयातील सहा प्राण्यांमध्ये कोरोनाची लक्षणे
 
 
 
मुंबई (प्रतिनिधी) - न्यूयाॅर्क शहराच्या ब्राॅन्क्स प्राणिसंग्रहालयातील एका वाघाची कोरोना चाचणी पाॅझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे. प्राणिसंग्रहालयातील आणखी तीन वाघ आणि सिंहांमध्ये कोरोनाशी संबंधित लक्षणे दिसत असल्याचे अमेरिकेच्या कृषी विभागाने रविवारी संध्याकाळी जाहीर केले. पाळीव प्राण्यांनंतर वन्यजीवांनामध्ये कोरोनाची लागण झाल्याचे हे पहिलेच प्रकरण आहे.
 
 
 
 
कोरोनाची लागण आता वन्यजीवांनाही होऊ लागल्याचे समोर आले आहे. न्यूयाॅर्कच्या ब्राॅन्क्स प्राणिसंग्रहालयातील 'नादिया' नामक मलयान वाघाला कोरोनाची लागण झाल्याची माहिती अमेरिकेच्या कृषी विभागाने दिली आहे. एका व्यक्तीकडून वन्यजीवांमध्ये कोरोनाचे संक्रमण होण्याची ही पहिलीच वेळ असल्याची माहिती प्राणिसंग्रहालयाचे संचालक पाॅल कॅले यांनी दिली. १६ मार्च पासून प्राणिसंग्रहालय पर्यटकांसाठी बंद करण्यात आले आहे. त्यामुळे कोरोनाची लागण झालेल्या कोण्या अज्ञाताकडून खास करुन प्राणिसंग्रहातील प्राणिपालांकडून वाघाला कोरोनाचे संक्रमण झाल्याची शक्यता कॅले यांनी व्यक्त केली आहे. यापूर्वी पाळीव प्राण्यांना कोरोनाची लागण झाल्याची बाब समोर आली आहे. त्यामध्ये हाॅंगकाॅंगमधील पोमेरानियन आणि जर्मन शेफर्ड जातीचे कुत्रे आणि बेलजियममधील मांजरीचा समावेश होता.
 
 
मार्चच्या शेवटच्या आठवड्यात नादियाला कोरडा खोकला झाला होता. त्यामुळे २ एप्रिल रोजी तिची कोरोना चाचणी केल्याचे, कॅले यांनी सांगितले. नादियाची बहिण, दोन सायबेरियन वाघ आणि तीन आफ्रिकन सिहांना खोकला, भूक न लागणे यासारखी लक्षणे दिसत आहेत. मात्र, त्यांची कोरोना चाचणी अजून झालेली नाही. यूएसडीए या रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्राने सांगितले आहे की, पाळीव किंवा वन्यजीवांमधून कोरोना व्हायपर मानवामध्ये संक्रमित होतो का ? या विषयी अजूनही पुरावा सापडलेला नाही.
 
@@AUTHORINFO_V1@@