महाराष्ट्र कोरोनाग्रस्त; 'शिवसेना' 'मार्केटींग'मध्ये व्यस्त

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Apr-2020
Total Views |
Aditya-Uddhav-Thackeray_1

धक्कादायक! राज्य संकटात आणि शिवसेना 
बॉलीवुडच्या मदतीने चालवतेय 'पीआर' कॅम्पेन


मुंबई
: मुख्यमंत्री असावा तर असा, राज्याचे नेतृत्व सीए आणि एचएम योग्य प्रकारे करत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यातील परिस्थिती उत्तम प्रकारे हाताळत आहेत, अशा आशयाचे संदेश तुम्हाला सोशल मीडियावर वाऱ्यासारखे फिरताना दिसत असतील. अगदी उद्धव ठाकरेंवर टीका करणारेही त्याचे गोडवे गात असल्याचे वेळोवेळी आपण पाहीले असेल. असे असताना मात्र, राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा कमी होण्याची चिन्हे का नाहीत, परिस्थिती हाताबाहेर का जात आहे, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. सारंकाही अलबेल खरंचं आहे का ? परिस्थिती हाताळण्यात सरकार यशस्वी झाले आहे का?, तसे असेल तर कॅबिनेट मंत्री शिवसेना नेते, युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांना बॉलीवूडशी हातमिळवणी करून शिवसेनेचा पीआर करण्याची गरज भासली नसती.
 
 


होय ! सर्वात आधी देश, त्यानंतर राज्य आणि त्यानंतर पक्ष व त्यानंतर स्वतः मी, अशा तत्वावर सुरू असलेल्या शिवसेना पक्षाला देश संकटात असताना पीआर कंपनीचा आधार घ्यावा लागत आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे युद्धपातळीवर काम करून कशाप्रकारे परिस्थिती हाताळत आहेत, याचे 'मार्केटींग' सोशल मीडियाच्या माध्यमातून जोराजोरात सुरू आहे. नाजूक परिस्थितीचा फायदा उठवत जनतेच्या मनात सहानुभूती निर्माण करण्याचा केविलवाणा प्रयत्न या 'पीआर कंपनी'द्वारे केला जात आहे. उद्धव ठाकरे यांची प्रतिमा उंच व्हावी यासाठी केलेला हा सर्व खटाटोप असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. दरम्यान, प्रतिमा उंचावण्यासाठी निवडलेली वेळ ही चुकीची असल्याची टीकाही आता होऊ लागली आहे.
 


PR_1  H x W: 0
 
 
लॉकडाऊन वगळता उद्धव ठाकरे सरकारने कुठलाही ठोस निर्णय राज्य पातळीवर घेतलेला नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रातर्फे मागवलेली १६ हजार कोटींचे पॅकेजचा हप्ताही मिळाला आहे. मग अद्याप सरकार ठोस उपाययोजना करण्यासाठी का कचरत आहे, असा प्रश्नही आता विचारला जात आहे. सत्ताधारी पक्षाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे वगळता अन्य कुठल्याही मंत्र्यांचा राज्य अडचणीत असताना सक्रीय सहभाग गेल्या काही दिवसांपासून दिसून आलेला नाही. महाविकास आघाडीतील आमदार आपापल्या मतदार संघात कुठल्या उपाययोजना करताना दिसलेले नाहीत.
 
 


PR_1  H x W: 0



याऊलट पीआर कंपन्यांच्या माध्यमातून राज्यातील सरकार कसे परिस्थिती हाताळण्यात यशस्वी झाले आहे तर केंद्र सरकार या उपाययोजना करण्यासाठी अपयशी ठरत आहे, अशी टीकाही केली जात आहे. एकीकडे राज्याचे प्रश्न केंद्र सरकारकडे घेऊन जायचे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा केली असेही सांगायाचे मात्र उलट पीआर कॅम्पेनमध्ये केंद्र सरकारवर टीका करायची असला प्रकार या काळात घडताना दिसत आहे. मोदी सरकारवर अत्यंत कडवड भाषेत टीका करणारे काही बॉलीवुड कलाकार गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे यांची स्तुती करताना दिसत आहेत. उद्धव आणि आदित्य ठाकरे यांचे आभार मानत आहेत. सोनम कपूर, स्वरा भास्कर, सुशांत सिंह आदींसारख्या कलाकारांनी गेल्या काही दिवसांपासून ठाकरे सरकारवर स्तुतीसुमने उधळली आहेत. समीत ठक्कर यांनी ट्विट करत या प्रकरणी प्रश्न उपस्थित केली आहे.




PR_1  H x W: 0
@@AUTHORINFO_V1@@