दिया जले जाँ जले...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Apr-2020   
Total Views |

jitendra avhad_1 &nb

 

मी मूर्ख नाही, असे मी म्हणालो खरे पण आता यावर भीती वाटते की लोक लगेच हॅशटॅग सुरू करतील. सर्वेक्षण करतील की, हे म्हणाले, मी मूर्ख नाही. यावर तुमचे मत काय? सांगा, चटकन बोला पटकन. हे मूर्ख आहेत का? पण मी प्रचंड हुशार आहे. मुंब्रा ही माझी जहागिरी आहे.



दिया जले, जाँ जले
नैनो तले धुआँ उठे...
एक प्रसिद्ध गीत. माझी नव्हे आमच्या सगळ्या मोदी विरोधकांची स्थिती अशीच झाली आहे. महाराष्ट्रात ‘कोरोना’ग्रस्तांची संख्या भीतीदायक पद्धतीने वाढते आहे. यावर सरकार काय दिवे लावते, असे लोक विचारत आहेत. त्यामुळे दिवे लावा म्हटले की, भीतीच वाटते. त्या मोदींना आमची भीती कळलेली दिसते म्हणूनच तर ते लोकांना म्हणाले, “दिवे लावा.” पण मी म्हणालोच की, “माझ्या घरातली लाईट चालू ठेवणार आणि एकही मेणबत्ती लावणार नाही, मी मूर्ख नाही.” खरे म्हटले तर मला कोणीही विचारले नव्हते की, विनंती केली नव्हती की सूचनाही केली नव्हती की दिवे लावा. पण न विचारताही काहीबाही बोलायचेच, हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे, त्यामुळे मी नेहमीप्रमाणे बोललोच.



मी मूर्ख नाही, असे मी म्हणालो खरे पण आता यावर भीती वाटते की लोक लगेच हॅशटॅग सुरू करतील. सर्वेक्षण करतील की, हे म्हणाले, मी मूर्ख नाही. यावर तुमचे मत काय? सांगा, चटकन बोला पटकन. हे मूर्ख आहेत का? पण मी प्रचंड हुशार आहे. मुंब्रा ही माझी जहागिरी आहे. मुंब्र्याचे भाईजान आणि आपाजान माझे मतदार आहेत. त्यांच्या आस्था, श्रद्धा काय? ते कोणाचा द्वेष करतात, हे माझ्याशिवाय कोण जाणते? जाणतेवरून आठवले की, माझ्याशिवाय जाणते राजेही आहेत. ते हे सगळे माझ्यापेक्षाही चांगल्या प्रकारे जाणतात. नव्हे त्यांच्याकडूनच हे बाळकडू मला मिळाले आहे. विषयांतर झाले. तर मुद्दा असा की, माझ्या मतदार संघाचा मी बादशहा आहे. माझ्या प्रजेच्या ‘हो’ ला ‘हो’ करणे माझे कर्तव्य आहे. दिवा लावणे, तेजाची पूजा करणे या गोष्टी कोण करते? माझे बहुसंख्य मतदार हे सगळे करणार नाहीत म्हणजे नाहीत. त्यामुळे मी दिवे लावणार नाही म्हणजे नाही. मेणबत्तीसुद्धा नाही लावणार. काय म्हणता, मोदींना सर्व देशभरातून अगदी जगभरातून समथर्र्न मिळते म्हणून आम्ही मुंब्रा व्हाया बारामती व्हाया दिल्ली आधीच सारेजण जळतोय. त्यात ते मंत्रालयपण अधमधे जळते. मोदी, भाजप, रा. स्व. संघ, जळण्यासाठी कारणे काय कमी आहेत? या अशा जळजळीमध्ये आणखीन काय दिवे लावू?
 

लेट करंट ट्यूबलाईट
 
 
टाळी वाजवून आणि दिवा लावून ‘कोरोना’ची समस्या जाणार नाही,” असे राहुल गांधी यांचे म्हणणे आहे. यावर काही कमळधार्जिण्या अतिनतद्रष्ट लोकांचे म्हणणे आहे की, कशाने काय होते हे माहिती असते तर राहुल गांधी पंतप्रधान झाले असते. असो, लोकांचे काय? ते तर राहुल गांधी म्हटले की, आलूपासून सोना ते पिचत्तर वगैरे वगैरे आठवणी काढतात. काहींना तर राहुल गांधी म्हटले की, डोळे मिचकावण्याचीही हुक्की येते. थोडक्यात राहुल गांधी या नावाभोवती लोकांच्या याच काय त्या आठवणी आहेत. तर असे हे राजकुमार. या राजकुमारांचे म्हणणे की, टाळी वाजवून आणि दिवा लावून ‘कोरोना’ जाणार नाही. यावर मोदीविरोधक, त्यातही श्रद्धेेने दिवा, निरांजन लावणे वगैरे या संस्कृतीवर विश्वास नसलेले आणि सगळ्याच गोष्टी विज्ञानात गुंडाळू पाहणारे लोक म्हणतील, हो बरोबर आहे. त्याने काय होणार आहे? सध्या ‘लॉकडाऊन’च्या काळात चॅलेंज घेण्याचे फॅड सुरू आहे, तर राहुल गांधींसकट वरील वर्गवारीत मोडणार्‍या सगळ्यांनी कृपया एक चॅलेंज घ्यावे. ‘लॉकडाऊन’मुळे घराच्या बाहेर पडू शकणार नसाल तरी संवाद माध्यमातून जरा लोकांशी संवाद करा. लोकांच्या मनात ‘कोरोना’मुळे भय, संशय आणि प्रचंड एकटेपणा आलेला आहे.



संशय म्हणजे किती संशय असावा तर ‘लॉकडाऊन’ काळात कुठेही घराबाहेर न पडलेल्या आपल्याच घरातील व्यक्तीपासूनही लोक शरीराने सोडाच मनानेही दूर गेले आहेत. लोकांचा सकारात्मकतेवरचा विश्वास तुटतोय की काय? असे भीषण दृश्य आज देशात आहे. या अशावेळी रात्रीच्या गर्भात असे उषःकाल असा आशावाद समाजात पेरणे महत्त्वाचा आहे. तुम्ही एकटे नाही, तर आपण सगळेच एक आहोत. कोरोनाच्या अंधाराला पळवून लावण्यासाठी आपण आपल्यापरीने प्रयत्न करू आणि यशस्वीही होऊ हा विचार पेरण्याची आज गरज आहे. ‘कोरोना’मुळे समाजमन खरंच दैन्यावस्थेत गेले आहे. समाजाला नकारात्मकतेवर सकारात्मकेचा विजय मिळवण्याच्या शक्तीची जाणीव करून द्यायची वेळ आहे. टाळ्या वाजवून आणि दिवे लावून हेच होणार आहे. अर्थात हे सगळे समजायला भारतीयांची मानसिकता समजावी लागेल. मात्र, ट्यूबलाईट लेट करंट असल्यावर त्यांना कसे समजणार? मात्र, समजत नसेल तर गप्प बसावे पण तेही नाही.
@@AUTHORINFO_V1@@