पुणे विद्यापीठाच्या कोणत्याही परीक्षा रद्द नाहीत

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Apr-2020
Total Views |

pune university_1 &n



सर्व अभ्यासक्रमाच्या परीक्षा नियमित होणार

पुणे : जगभर थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव भारतात दिवसेंदिवस वाढत चालला आहे. कोरोनामुळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षांचे वेळापत्रक कोलमडले आहे. या पार्श्वभूमीवर पुणे विद्यापीठाने सर्व अभ्यासक्रमाच्या परीक्षा १४ एप्रिलपर्यंत पुढे ढकलल्या आहेत. मात्र कोणतीही परीक्षा रद्द केली जाणार नाही अशी माहिती विद्यापीठाचे उपकुलगुरु डॉ. एन. एस. उमराणी यांनी दिली.


कोरोनामुळे सरकारने सर्व शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे. मात्र ही सुट्टी जाहीर होण्यापूर्वी कला, वाणिज्य, विज्ञान या तिन्ही शाखांच्या पदवी परीक्षा सुरु होत्या. तर पदव्युत्तर आणि व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या परीक्षा अद्याप सुरु झालेल्या नाही. यामुळे गेल्या काही दिवसांपासून प्रथम वर्षाच्या परीक्षा रद्द केल्या जाणार असल्याची चर्चा सुरु होती. मात्र व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत कोणत्याही अभ्यासक्रमाच्या परीक्षा रद्द केल्या जाणार नाही, असा निर्णय घेण्यात आला.


पुणे विद्यापीठाच्या सर्व प्रकारच्या परीक्षा १४ एप्रिलपर्यंत पुढे ढकलल्या आहेत. त्यानंतर लॉकडाऊनंतर या सर्व परीक्षा नवीन वेळापत्रकानुसार घेतल्या जातील. त्यामुळे विद्यार्थ्यांना लॉकडाऊननंतर परीक्षेला सामोरे जावे लागणार आहे.
@@AUTHORINFO_V1@@