रक्ताचा तुटवडा लक्षात घेऊन मंदिराच्या प्रांगणात 'रक्तदान शिबीर'

    04-Apr-2020
Total Views |



1_1  H x W: 0 x




विजय तांडेल यांच्या पुढाकाराने झाला कार्यक्रम

मुंबई (विशेष वृत्त) : देशभरात कोरोनामुळे लॉकडाऊन झाला असल्यामुळे रक्ताचा तुटवडा असल्याच्या बातम्या आपण ऐकल्या होत्या. दरम्यान काही धर्मांधांकडून थुंकी, शिव्या यांचे गलिच्छ प्रकारही आपण ऐकले. या गदारोळात मुंबईतून अत्यंत सुखद बातमी कानावर आली आहे.




3_1  H x W: 0 x



रुग्णालयातील रक्ताचा तुटवडा विचारात घेऊन रक्तदान शिबिराचे आयोजन आराध्य लोकसेवा प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले होते. विजय तांडेल हे माजी नगरसेवक असून आराध्य लोकसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष आहेत. चुनाभट्टी येथील साईनाथ सेवा मंडळाच्या आवारात शिबीर संपन्न झाले. सोशल डीस्टन्स पाळूनच संपूर्ण शिबिराचे आयोजन झाले होते. शिबिराला अत्यंत उस्फुर्त प्रतिसाद लाभला. जवळपास २३२ लोकांनी या शिबिरात रक्तदान केले.



2_1  H x W: 0 x


सगळीकडे नकारात्मक वातावारण असताना मुंबईतील या कार्यक्रमाने वातावरणात चैतन्य पसरले आहे. मंदिराच्या प्रांगणात झालेल्या या कार्यक्रमाने सामाजिक भान जपण्याचा नवा आदर्श घालून दिला आहे